फ्रेंच ओपन बॅडमिंटन, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 03:37 IST2018-10-27T03:37:28+5:302018-10-27T03:37:39+5:30

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जपानची सायाका सातोको हिचा सरळ गेममध्ये पराभव करीत फ्रेंच ओपन बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर ७५० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

French Open badminton, Sindhu quarter-finals | फ्रेंच ओपन बॅडमिंटन, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

फ्रेंच ओपन बॅडमिंटन, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

पॅरिस : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जपानची सायाका सातोको हिचा सरळ गेममध्ये पराभव करीत फ्रेंच ओपन बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर ७५० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
तिसरी मानांकित सिंधूने सायाकाचा २१-१७,२१-१६ ने पराभव केला. तिची गाठ सातवी मानांकित ही बिगजियाओ हिच्याशी पडेल. दुसरीकडे आशियाई क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन इंडोनेशियाचा जोनाथन ख्रिस्ती याने साईप्रणीतचा २१-१६,२१-१४ ने पराभव केला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी- चिराग शेट्टी तसेच मनू अत्री- बी. सुमीत रेड्डी यांनी उपांत्यपृूर्व फेरीत धडक दिली आहे.
सात्विक- चिराग जोडीने चीनचे ही जितिंग- तान कियांग यांचा २१-१३,२१-१९ ने तसेच मनू- सुमित यांनी चीनचे लियू चेंग- झांग नान यांचा २१-१४,२१-१६ ने पराभव केला. जे. मेघना आणि पूर्विषा राम या चौथ्या मानांकित जोडीला मात्र इंडोनेशियाची चौथी मानांकित जोडी ग्रेसिया पोली- अप्रियानी राहायू यांच्याकडून २१-१५,२१-१३ ने पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)

Web Title: French Open badminton, Sindhu quarter-finals