जगातील अव्वल खेळाडूच्या गाडीला भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 11:37 IST2020-01-13T11:36:35+5:302020-01-13T11:37:31+5:30
एका ट्रकनं त्यांच्या गाडीला जोरदार टक्कर दिली आणि गाडीनं लगेच पेट घेतला

जगातील अव्वल खेळाडूच्या गाडीला भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू तर...
जगातील अव्वल बॅडमिंटनपटू केंटो मोमोटा याच्या गाडीचा मलेशियात भीषण अपघात झाला. मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावून तो परतत होता. जपानचा हा स्टार बॅडमिंटनपटू तीन सहकाऱ्यांसोबत क्वालालम्पूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतत होता. तेव्हा एका ट्रकनं त्यांच्या गाडीला जोरदार टक्कर दिली आणि गाडीनं लगेच पेट घेतला. यात गाडीचा चालक जागीच ठार झाला.
पहाटे 4.45 वाजता ही दुर्घटना घडली.चालक मलेशियन होता आणि त्याचे शव पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. अन्य चारजणांना किरकोळ दुखापत झाली आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अन्य चारजणांमध्ये ब्रिटीश बॅटमिंटन तांत्रिक अधिकारी फोस्टर विलियम थॉमस, जपानचे फिजीओथेरापिस्ट हिरायमा यू आणि सहाय्यक प्रशिक्षक मोरीमोटो आर्किफुकी यांचा समावेश आहे.
या अपघातात मोमोटाच्या नाकाला जबर फटका बसला आहे, तर त्याच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर मार लागला आहे. अन्य तिघांच्या हाता-चेहर्यावर दुखापत झाली आहे.