All England Open 2018 : भारताच्या पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 09:25 PM2018-03-16T21:25:04+5:302018-03-16T21:25:04+5:30

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे.

All England Open 2018: India's P. V. Sindhu enters semi-finals | All England Open 2018 : भारताच्या पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक

All England Open 2018 : भारताच्या पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक

Next

लंडन - भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूने शुक्रवारी उपांत्य सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराचे कडवे आव्हान 20-22, 21-18, 21-18 असे परतवून लावत उपांत्य फेरी गाठली. 
अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत ओकुहाराने सिंधूसमोर जबरदस्त आव्हान उभे केले. पहिल्या गेममध्ये तिने  22-20 ने बाजी मारत सिंधूला अडचणीत आणले. मात्र पहिला गेम गमावल्यानंतर सिंधूने लढतीत जोरदार कमबॅक केले. तिने दुसरा गेम 21-18 ने जिंकून लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये ओकूहारावर 21-18 ने मात करून सामना खिशात टाकला.  



 

 

 

Web Title: All England Open 2018: India's P. V. Sindhu enters semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.