यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 17:28 IST2025-09-13T17:27:18+5:302025-09-13T17:28:01+5:30
GST Rate Of Yamaha: यामाहाच्या आरएक्स-१०० साठी तर जीव तुटायचा. आरएक्स-१०० चा जमाना गेला आणि मग एफझेडचा आला. त्या काळात तीच एक मोटरसायकलमधील एसयुव्ही होती.

यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
यामाहाच्या दुचाकींची क्रेझ आजच्या जेन झेडला बहुदा माहिती नसेल. पण आता जे ४०-५०शीच्या उंबरठ्यावर आहेत, त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनात नक्कीच अनुभवली असेल. यामाहाच्या आरएक्स-१०० साठी तर जीव तुटायचा. आरएक्स-१०० चा जमाना गेला आणि मग एफझेडचा आला. त्या काळात तीच एक मोटरसायकलमधील एसयुव्ही होती. या यामाहा कंपनीने जीएसटी कपातीनंतरचे एफझेडपासून ते R15, फसिनोसह सर्व दुचाकींचे दर जाहीर केले आहेत.
आज या दोन मोटरसायकल चालविणारी पिढी, गेला तो जमाना राहिल्या त्या आठवणी... अशातच रमलेली असेल. तेव्हाच्या किंमतीपेक्षा आताची एफझेडची किंमत डबलच झाली होती ती आता जीएसटीमुळे पुन्हा थोडी कमी झाली आहे. एफझेड एस हायब्रिडची किंमत 1,45,190 वरून 1,33,159 रुपये करण्यात आली आहे. 12,031 रुपयांचा जीएसटी लाभ मिळणार आहे.
एफझेडच्याच तोलामोलाची एसयुव्ही स्कूटर Aerox 155 ती किंमतदेखील 12,753 रुपयांनी कमी होणार आहे.
यामहाची स्कूटर उसिनोची किंमत 8,509 रुपयांनी कमी होत आहे. ती आता एक्सशोरुम दिल्ली 94,281 रुपयांना मिळणार आहे. तर RayZR ही 7,759 रुपयांनी कमी झाली आहे. यामहाच्या दोन स्पोर्टी लुकवाल्या मोटरसायकल R15 आणि MT15 ची किंमत अनुक्रमे 17,581 आणि 14,964 रुपयांनी कमी झाली आहे. या सर्व किंमती २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.