शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

Yamaha ने लाँच केल्या धमाकेदार बाईक्स, KTM-Triumph ला देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 14:31 IST

ग्राहक बराच वेळ या दोन्ही बाईकची वाट पाहत होते.

नवी दिल्ली : दिग्गज दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा मोटार इंडियाने (Yamaha Motor India) अखेर Yamaha R3 आणि Yamaha MT-03 लाँच केली आहे. ग्राहक बराच वेळ या दोन्ही बाईकची वाट पाहत होते. Yamaha R3 बद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक यापूर्वी देखील भारतात विकली गेली होती. आता ही बाईक 4.64 लाख रुपयांच्या किंमतीत (एक्स-शोरूम) लाँच झाली आहे. 

Yamaha MT-03 ची एक्स-शोरूम किंमत 4.59 लाख रुपये आहे. ही बाईक पहिल्यांदाच भारतात दाखल झाली आहे. कंपनीने या दोन्ही बाईक सीबीयू रुटद्वारे भारतात आणणार आहे. त्यामुळे किमतीच्या दृष्टीने या बाईक बऱ्यापैकी महाग आहेत. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, Yamaha R3 ही बाईक R15 सारखी दिसते. दुसरीकडे, MT-03 ची डिझाईन Yamaha MT-15 सारखी दिसते. 

Yamaha R3 : डिझाईनYamaha R3 मध्ये ड्युअल एलईडी हेडलॅम्पसह फुल फेअरिंग डिझाइन मिळते. बाईकचे वजन 169 किलो आहे. तसेच, सीटची उंची 780 मिमी आहे. या बाईकला पुढील बाजूस अपसाइड-डाउन फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सेटअप मिळेल. ब्रेकिंगसाठी दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक्स आणि ड्युअल चॅनल एबीएस मिळतील.

Yamaha R3 : इंजिनYamaha R3 च्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या बाईकला 321cc लिक्विड कूल्ड पॅरलल ट्विन इंजिनची पॉवर मिळते. या बाईकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स आहे. तर फीचर्समध्ये एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असणार आहे. मात्र, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळणार नाही.

Yamaha MT-03 : स्पेसिफिकेशन्सYamaha MT-03 ची डिझाईन MT-15 सारखी नेकेड आहे. यामध्ये अग्रेसिव्ह स्टाईल फ्यूल टँकसह एलईडी हेडलॅम्प आहे. तसेच, Yamaha R3 प्रमाणे, यातही पुढील बाजूस अपसाइड-डाउन फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक आहेत. MT-03 चे चेसिस आणि इंजिन  R3 स्पेसिफिकेशन्स प्रमाणेच आहेत. याबाईकमध्ये 321cc पॅरेलल ट्विन इंजिन पॉवर देण्यात आले आहे. तसेच, 6 स्पीड गिअरबॉक्स मिळेल.

मार्केटमध्ये टक्कर कोणाला देणार?Yamaha R3 भारतीय बाजारपेठेत KTM RC 390 ला टक्कर देऊ शकेल.  Yamaha MT-03 च्या एंट्रीमुळे KTM Duke 390 आणि Triumph Speed ​​400  चे टेन्शन वाढू शकतो.

टॅग्स :yamahaयामहाbikeबाईकAutomobileवाहन