शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

ड्रायव्हिंग फटिग टाळण्यासाठी काय काय कराल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 3:32 PM

ड्रायव्हिंग फटिग हा प्रकार अनेकदा लांबच्या प्रवासामध्ये कार चालवताना वा एखादे वाहन चालवताना येतो. तो टाळणे गरजेचे आहे, त्यामुळे ड्राइव्हिंगचा आनंद नक्कीच वाढतो. ताजेतवाने व उत्साही वाटते.

ठळक मुद्देवाहन चालवण्याची हौस असते मात्र ड्रायव्हरच्या आसनावर बसल्यानंतर काहीवेळातच ड्रायव्हिंगचा कंटाळा येतो, दमल्यासारखे वाटते वा अनइझीनेस जाणवतो. या प्रकाराला साधारण ड्रायव्हिंग फटिग असे म्हणतात.विशेष करून लांबच्या प्रवासामध्ये ड्राइव्ह करताना अशा प्रकारचा थकवा जाणवतो.

वाहन चालवण्याची हौस असते मात्र ड्रायव्हरच्या आसनावर बसल्यानंतर काहीवेळातच ड्रायव्हिंगचा कंटाळा येतो, दमल्यासारखे वाटते वा अनइझीनेस जाणवतो. या प्रकाराला साधारण ड्रायव्हिंग फटिग असे म्हणतात. विशेष करून लांबच्या प्रवासामध्ये ड्राइव्ह करताना अशा प्रकारचा थकवा जाणवतो. याला केवळ तुमचे शरीरच नव्हे तर अनेकदा कारच्या ड्रायव्हिंग सीट्सचा, विशिष्ट पद्धतीने असलेल्या बसण्याच्या अँगलचा, स्टिअरिंग व्हीलच्या कठीणपणाचा, रात्रीच्यावेळी कार चालवताना समोर असलेल्या प्रकाशामधील कमतरतेचा त्रास व एकूणच लांबचा प्रवास झाल्याने पाठीला व मानेला होणाऱ्या अवघडपणाचा त्रास हे घटक कारणीभूत असतात. यामध्ये काहीवेळा विशिष्ट पद्धतीच्या कार्सही तितक्याच जबाबदार असतात. लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी ड्रायव्हिंग सिड व त्या सीटचा अँगलही जबाबदार असतो.

जसे संगणकावर बसून बसून काम करण्याने विशिष्ट वेळेनंतर फटिग वा थकवा आल्यासारखे जाणवते. कीबोर्ड जर मेकॅनिकल नसेल तर काम करताना बोटांना एक प्रकारचा शीण येतो. तसाच काहीसा हा प्रकार ड्रायव्हिंग फटिगमध्ये आहे.

लांबच्या प्रवासाची सवय नसेल किंवा पहिल्यांदाच ड्रायव्हिंग लांबच्या प्रवासामध्ये केले जात असेल तर हा त्रास जाणवतो. प्रथम उत्साहाने ड्रायव्हिंग केले जाते, त्यावेळी जो ताजेपणा वाटतो, शरीराला थकवा वाटत नाही, तसे कायम राहाणे शक्य नाही. अर्थात शरीर म्हणटल्यानंतर तसे होणार परंतु ते काही वेळात वा तासा-दोन तासात होत असले तर मात्र ड्रायव्हिंग फटिग आला असे नक्की समजावे. काहीवेळा शहरातील अति वाहतूक कोंडीमधून कार शहराबाहेर जाताना लागणारा वेळ लांबच्या प्रवासामध्ये ड्यायव्हिंग फटिग आणणारा ठरतो. हे सर्व टाळण्यासाठी कार बदलू शकत नाही, मात्र कारच्या ड्रायव्हरच्या आसनामध्ये काही ना काही बदल करत राहणे त्यावेळी गरजेचे असते. सर्वसाधारणपणे कारच्या ड्रायव्हरचे आसन पुढे मागे घेणे, पाठीचा भाग मध्ये मध्ये पुढे मागे वा आरामदायी वाटेल असा ठेवणे, मागे उशी घेणे, सीट उंच करणे वा, आसनावर एखादी उशी घेमे, मानेला हेडरेस्ट जरूर असावे व ते ही मध्ये मध्ये काहीसे वरखाली करून मानेला मिळणाऱ्या आधारासाठी अंश बदलून घ्यावे. अशाने बराच त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे तासाभराने पाच-दहा मिनिटे कार थांबवून बाजूला घ्यावी व शरिराची थोडी अन्य हालचाल करावी. स्ट्रेचिंग करावे.

लांबच्या प्रवासामध्ये कारच्या स्टिअरिंग व्हीलच्या अँडजेस्टमेंटची सुविधा असेल तर ती ही मध्ये मध्ये बदलून पाहावी. हे करीत असताना अर्थात कार थांबवून हे करावे. चालत्या कारमध्ये ड्राइव्ह करताना करू नये. अनेकदा सलग ड्राइव्हिंग करावे लागते, शक्यतो अतिसलग वाहनचालन करू नये. दूरच्या प्रवासात अंतर कापण्याची घाई वा विनाकारण त्या घाईतून वेग वाढवण्याचा प्रयत्नही करू नये. शांत चित्ताने ड्रायव्हिंग करणे महत्त्वाचे असते. काही कार बसक्या असतात, त्यावेळी बसक्या कारमध्ये पाय आखडण्याची शक्यता अधिक असते. अशासाठी तासा-दोनतासाने कार थांबवून शरीर मोकळे करावे.

ठळक मुद्दे

- सलगपणे ड्रायव्हिंग न करता मध्ये मध्ये थांबावे.

- थोडे अंग मोकळे करावे, शरीर स्ट्रेज करावे.

- डोळ्यांवर पाण्याचा हबका मारावा.

- उन्हामध्ये त्रास होत असेल तर गॉगल लावावा.

- शरीर ताणून वा कडक करून ड्रायव्हिंग करू नये.

- शरीराला सैल ठेवावे.

- नजर समोर स्थिर व दक्ष राहावी यासाठी हेडरेस्ट निट जुळवावा.

- कार स्वच्छ ठेवावी.

- उन्हाळ्यात जास्त ड्रायव्हिंग फटिग येतो, त्यावेळी एसी लावावा.

- सतत एसीमध्येही बसू नये.

- बाजूचे व सेंटरला असणारा आरसा व मागील दृश्य सहज दिसेल असा जुळवून घ्यावेत.

- टायरमधील हवा अचूक असावी.

- रात्री हेडलाइटचा प्रकाश कमी वाटत असेल तर त्रास वाढू शकतो.

- पुढील व मागील काच नेहमी स्वच्छ ठेवावी, पाणी मारून वायपरचा वापर करावा.

- सर्वात महत्त्वाचे म्हणजे आवश्यक तितके पाणी पित जावे.

- गरज वाटली तर काही वेळ विश्रांतीही घ्यावी.