शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आता Ertiga चं काय होणार? बाजारात येतायत नव्या 7 सिटर कार, धडाधड लॉन्च होणार 3 नवे मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 20:09 IST

आता लवकरच मारुती एर्टिगाच्या अडचणी वाढणार आहेत. बाजारात याच प्राईस रेन्जमध्ये 3 नव्या MPV लॉन्च होत आहेत. 

मारुती सुझुकी एर्टिगा ही भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पसंत केली  जाणारी कॉम्पॅक्ट MPV कार आहे. किफायतशीर किंमत, प्रशस्त इंटिरियर आणि मायलेज यामुळे ही कार अधिक पसंत केली जाते. या कारची किंमत 8.35 लाख रुपयांपासून सुरू होऊन 12.79 लाख रुपयांपर्यंत जाते. महत्वाचे म्हणजे ही कार अनेक वेळा देशातील सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कारही ठरली आहे. मात्र आता लवकरच मारुती एर्टिगाच्या अडचणी वाढणार आहेत. बाजारात याच प्राईस रेन्जमध्ये 3 नव्या MPV लॉन्च होत आहेत. 

Citroen 7 Seater MPVफ्रान्सची वाहन निर्माता कंपनी Citroen एका नव्या MPV वर काम करत आहे. जी C3 हॅचबॅकवर आधारित असेल. कंपनी या कारचे 5-सिटर व्हर्जनही लॉन्च करत आहे. जे कॉम्पॅक्ट एसयूव्हीला टक्कर देईल. नवी सिट्रोएन 7-सीटर एमपीव्हीचे नाव C3 एअरक्रॉस असू शकते. हिचे बेस व्हेरिअंट Maruti Ertiga ला टक्कर देईल, तसेच हिचे टॉप ट्रिम्स Kia Carens चा सामना करेल. यात 1.2 लिटर, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. तसेच, या खालच्या व्हेरिअँटमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्ससह 1.0 लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल मोटर मिळू शकते.

Nissan 7 Seater MPV -निसान इंडियाने नुकतेच आपल्या पोर्टफोलिओ वाढविण्यासंदर्भात घोषणा केली. ही कंपनी 2 नव्या एसयूव्हीसह 1 नवी एमपीव्हीही घेऊन येत आहे. कंपनीची 7-सीटर एमपीव्ही रेनॉल्टची 7-सीटर ट्रायबरवर आधारलेली असेल. यात 1.0 लिटरचे 3-सिलिंडर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले जाईल. याच बरोबर मॅन्युअल आणि सीव्हीटी दोन्ही गिअरबॉक्स दिले जाऊ शकतात. हिचे काही डिझाईन एलिमेंट आणि फीचर्स निसान मॅग्नाइटकडून घेतले जाऊ शकतात.

Toyota Rumion MPV -टोयोटाने दोन वर्षांपूर्वी भारतात 'Rumion' नेमप्लेटचा ट्रेडमार्क केला होता. ही 2023 मध्ये लॉन्च होऊ शकते, असे बोलले जात आहे. ही मारुती एर्टिगाचे री-बॅज व्हर्जन असेल. Toyota Rumion MPV मध्ये वेगळ्या पद्धतीने डिझाईन केले गेलेले फ्रंट ग्रिल, हेडलॅम्प आणि नवे रिअर सेक्शन असू शकते. नवी टोयोटा कॉम्पॅक्ट एमपीव्ही मध्ये 1.5 लिटर, 4-सिलिंडर डुअलजेट इंजिन असेल. जे Ertiga तही असते. यात पॅडल शिफ्टर्ससह 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक दिले जाईल. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकार