टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित एसयूव्ही 'टाटा सिएरा' नुकतीच भारतीय बाजारात लॉन्च झाली आहे. ही एक ५-सीटर एसयूव्हीअसून, अनेक व्हेरिअंट्समध्ये लॉन्च करण्यात आली आहे. आता कंपनीने या एसयूव्हीच्या टॉप मॉडेलसह सर्व व्हेरिएंट्सच्या एक्स-शोरूम किमती जाहीर केल्या आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत ₹ ११.४९ लाख रुपयांपासून सुरू होऊन ₹ २१.२९ लाख रुपयांपर्यंत जाते.
कंपनीची ही सिएरा, 'स्मार्ट प्लस', 'प्योर', 'प्योर प्लस', 'अॅडव्हेंचर', 'अॅडव्हेंचर प्लस', 'अकम्प्लिश्ड' आणि 'अकम्प्लिश्ड प्लस', अशा विविध मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.
Tata Sierra च्या सर्व व्हेरिअंट्सची किंमत अशी -- टाटा सिएरा स्मार्ट प्लस व्हेरिअंट : १.५-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन (मॅन्युअल ट्रान्समिशन) सह असलेल्या बेस मॉडेलची किंमत ₹ ११.४९ लाख आहे. तर १.५-लीटर क्रायोजेट डिझेल इंजिन असलेल्या बेस मॉडेलची किंमत ₹ १२.९९ लाख आहे.
- प्योर आणि प्योर प्लस: टाटा सिएराच्या प्योर व्हेरिएंट्सची किंमत ₹ १२.९९ लाख ते ₹ १५.९९ लाख आहे, तर प्योर प्लस व्हेरिएंट्स ₹ १४.४९ लाख ते ₹ १७.४९ लाख रुपयांच्या दरम्यान आहेत.
- अॅडव्हेंचर आणि अॅडव्हेंचर प्लस : सिएरा च्या अॅडव्हेंचर मॉडलमध्ये तीन व्हेरिअँट लॉन्च करण्यात आले आहेत. अॅडव्हेंचर मॉडेल ₹ १५.२९ लाख ते ₹ १६.७९ लाख दरम्यान उपलब्ध आहे, तर अॅडव्हेंचर प्लसची किंमत ₹ १५.९९ लाख ते ₹ १८.४९ लाखपर्यंत जाते.
- टॉप मॉडेल अकम्प्लिश्ड आणि अकम्प्लिश्ड प्लस : सिएराच्या Accomplished मॉडलचे चार व्हेरिअँट आणि Accomplished Plus चे तीन व्हेरिअँट बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. Accomplished व्हेरिएंट्सची किंमत ₹ १७.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉपचे Accomplished Plus मॉडेल ₹ २१.२९ लाखांपर्यंत पोहोचते.
Web Summary : Tata Motors launched the Sierra SUV in India, offering multiple variants. Ex-showroom prices range from ₹11.49 lakh to ₹21.29 lakh. Models include Smart Plus, Pure, Adventure, and Accomplished, each with varied features and pricing.
Web Summary : Tata Motors ने भारत में Sierra SUV लॉन्च की, जिसमें कई वेरिएंट उपलब्ध हैं। एक्स-शोरूम कीमतें ₹11.49 लाख से ₹21.29 लाख तक हैं। मॉडलों में स्मार्ट प्लस, प्योर, एडवेंचर और अकम्प्लिश्ड शामिल हैं, जिनमें विभिन्न विशेषताएं और मूल्य निर्धारण हैं।