मुंबई : मारुती सुझुकीची प्रिमियम सेदान प्रकारामध्ये कमालीची लोकप्रिय ठरलेल्या सियाझ कारचे नवे मॉडेल लवकरच बाजारात दाखल होणार आहे. नेक्सा या ब्रँडच्या ताफ्यात येणाऱ्या या कारची आगाऊ नोंदणी 10 आॅगस्टपासून सुरु करण्यात येणार असून अवघ्या 11 हजार रुपयांमध्ये नेक्साच्या वेबसाईटवर नोंदणी करता येणार आहे. सियाझ या सेदानमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. लूकसह आतील वैशिष्टेही बदलण्यात आली आहेत. सियाझमुळे कंपनीच्या प्रिमियम सेदान प्रकारातील ताकद वाढणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 20 ऑगस्टला ही कार लाँच करण्यात येणार आहे. चार वर्षांपूर्वी ही कार पहिल्यांदा लाँच करण्यात आली होती. त्यानंतर या कारमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. हे बदल गरजेचे होते. कारण टोयोटाने यारिस, होंडाने सिटी आणि ह्युंदाई ने व्हेर्ना या कार नव्याने बाजारात आणल्या होत्या. नव्या सियाझमध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स ऐवजी 5 स्पीड गिअरबॉक्स येण्याची शक्यता आहे. तसेच नवे 1.5 लिटर पेट्रोल इंजिन बसविण्यात येणार आहे.
काय म्हणताय! सियाझची आगाऊ नोंदणी सुरु झाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 16:01 IST