वॉल्वोची नवीन XC90 लॉन्च; किंमत कोटीपासून सुरू... पहा काय काय आहे त्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:30 IST2025-03-11T13:28:56+5:302025-03-11T13:30:32+5:30
XC90 ची उंची हवी तशी वाढविता येते आणि कमीही करता येते.

वॉल्वोची नवीन XC90 लॉन्च; किंमत कोटीपासून सुरू... पहा काय काय आहे त्यात...
वॉल्वो कार इंडियाच्या वतीने आज नवीन XC90 चे अनावरण करण्यात आले.या कारची किंमत रु. 1,02,89,900 (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आले.
यावेळी वॉल्वोचे जान थेस्लेफ आणि वॉल्वो कार इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर ज्योती मल्होत्रा उपस्थित होते. सुरक्षेसाठी लेन ड्रिफ्टवरील तंत्रज्ञान देण्यात आले आहे. जे रडार आणि समोरील कॅमेऱ्याचा वापर करून संभाव्य टक्कर टाळते व कार पुन्हा आपल्या लेनमध्ये आपोआप आणते. वाहने, पादचारी, सायकलस्वार आणि मोठ्या प्राण्यांना ओळखून टक्कर टाळते. XC90 ही रस्त्यावरील सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एक असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
एअर सस्पेंशन प्रणाली, रस्ता आणि चालकाचे प्रति सेकंद 500 वेळा निरीक्षण तसेच राईड हाइट अॅडजस्टमेंट म्हणजेच गाडीची उंची 20 एमएमएने कमी करता येते. तसेच उंची 40 एमएमने वाढविताही येते. या वाढलेल्या उंचीमुळे खराब रस्त्यांवरचा बाहेरचा आवाज कमी करता येतो.
नवीन 11.2-इंच (28.44 सेमी) सेंटर डिस्प्ले, सुधारित साऊंड इन्सुलेशन, स्प्लिट स्क्रीनसह सुधारित 360° कॅमेरा, बोवर्स आणि विल्किन्स प्रीमियम साउंड, 360-डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल आणि पायलट असिस्टंट आदी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यामध्ये XC 90 बी5 अल्ट्रा (पेट्रोल माइल्ड-हायब्रिड) 1969 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 250 एचपी व 360 एनएम टॉर्क प्रदान करते. 8-स्पीड एडब्ल्यूडी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. वेंटिलेटेड मसाज फ्रंट सीट्सही देण्यात आल्या आहेत. अँड्रॉइड-संचालित इन्फोटेनमेंट प्रणाली, अॅपल कारप्ले (वायर्ड) आदी देण्यात आले आहेत. तसेच 20 इंची व्हिल्सही देण्यात आले आहेत.