भारतात तयार झालेल्या या नव्या कारला मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग, अपघातात वाचवेल जीव! जाणून घ्या किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 04:58 PM2022-12-02T16:58:54+5:302022-12-02T16:59:49+5:30

या कारमध्ये ड्रायवर आणि पॅसेन्जरच्या डोक्यासंदर्भात आणि मानेसंदर्भात चांगली सेफ्टी दिसून आली आहे. तसेच, ड्रायव्हरच्या छातीच्या बाबतीतही पुरेशी सुरक्षितता दिसून आली आहे.

volkswagen virtus made in India got 5 star safety rating, will save lives in an accident Know the price | भारतात तयार झालेल्या या नव्या कारला मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग, अपघातात वाचवेल जीव! जाणून घ्या किंमत 

भारतात तयार झालेल्या या नव्या कारला मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग, अपघातात वाचवेल जीव! जाणून घ्या किंमत 

googlenewsNext

मेड-इन-इंडिया फॉक्सवॅगन व्हर्टसला लॅटिन NCAP ने (न्यू कार असेसमेन्ट प्रोग्रॅम्स) 5-स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहे. या मॉडेलने अडल्ट ऑक्यूपेन्ट प्रोटेक्शन टेस्टमध्ये 36.94 गूण (92%) मिळवले आहेत. यात फ्रंटल आणि साइड इम्पॅक्ट क्रॅश टेस्टचाही समावेश आहे. या कारने चाइल्ड ऑक्यूपेन्ट प्रोटेक्शन टेस्टमध्येही चांगले प्रदर्शन केले आहे. फॉक्सवॅगन व्हर्टसमध्ये ड्रायवर आणि पॅसेन्जरच्या डोक्यासंदर्भात आणि मानेसंदर्भात  चांगली सेफ्टी दिसून आली आहे. तसेच, ड्रायव्हरच्या छातीच्या बाबतीतही पुरेशी सुरक्षितता दिसून आली आहे.

सेडानचे बॉडीशेल स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. साइड इफेक्ट चाचणीमध्ये फोक्सवॅगन व्हर्टसने डोके आणि पोटासाठी चांगली सुरक्षितता आणि छातीसाठी पुरेसे संरक्षण दिल्याचे दिसून आले आहे. साइड पोल इम्पॅक्टमध्ये चेस्ट प्रोटेक्शनला मार्जिनल रेट देण्यात आला आहे. फॉक्सवॅगन व्हर्टसने सेफ्टी असिस्टमध्ये 36.54 गूण (84.98%) मिळवले आहेत. टेस्ट करण्यात आलेल्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी), सर्व सीटिंग पोझिशन्ससाठी सीटबेल्ट रिमाइंडर आणि स्पीड असिस्ट सिस्टम होते.

भारतात फॉक्सवॅगन व्हर्टस दोन इंजिन पर्यायांत उपलब्ध आह. एक, 1.0L, 3-सिलिंडर TSI टर्बो-पेट्रोल आणि दुसरे 1.5L, 4-सिलिंडर TSI पेट्रोल. पहिले इंजिन 115bhp मॅक्स पॉवर आणि 178Nm पीक टार्क जनरेट करते. तसेच दुसरे इंजिन 150bhp मॅक्स पॉवर आणि 250Nm पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन पर्यायांत 6-स्पीड मॅनुअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड डुअल-क्लच ऑटोमॅटिक (केवळ 1.5L पेट्रोल व्हेरिअंट) चा समावेश आहे.

फॉक्सवॅगन व्हर्टस Comforline, Highline, Topline आणि GT Plus या चार ट्रिम्समध्ये येते. हिची किंमत 11.32 लाख रुपयांपासून ते 18.42 लाख रुपयांपर्यंत आहे. मॉडेल लाइनअपमध्ये तीन ऑटोमॅटिक व्हेरिअंट- हायलाइन एटी, टॉपलाइन एटी आणि जीटी प्लस आहे. यांची किंमत अनुक्रमे, 14.48 लाख रुपये, 16 लाख रुपये आणि 18.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे.
 

Web Title: volkswagen virtus made in India got 5 star safety rating, will save lives in an accident Know the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.