शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

Volkswagen Ameo TDI DSG : चकाचक लूक अन् टकाटक परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 17:15 IST

Volkswagen Ameo ही कार सर्वात आधी 2016मध्ये बाजारात दाखल झाली होती. तिचं पहिलं व्हर्जन पेट्रोल इंजिनचं होतं आणि नंतर तिचं डिझेल इंजिन मॉडेलही आलं होती. सब 4 मीटर सेडान सेग्मेंटमध्ये या कारचं ऑटोमॅटिक व्हर्जनही बाजारात उपलब्ध आहे.

- सुवासित दत्तनवी दिल्लीः Volkswagen Ameo ही कार सर्वात आधी 2016मध्ये बाजारात दाखल झाली होती. तिचं पहिलं व्हर्जन पेट्रोल इंजिनचं होतं आणि नंतर तिचं डिझेल इंजिन मॉडेलही आलं होती. सब 4 मीटर सेडान सेग्मेंटमध्ये या कारचं ऑटोमॅटिक व्हर्जनही बाजारात उपलब्ध आहे. भारतीय बाजारासाठी ही कार थोडी जुनी झाली असली, तरी या कारचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि तिची एकंदर कामगिरी जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. Volkswagen Ameo TDI ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकते का, हे आम्ही तपासून पाहिलं.Volkswagen Ameo ही कार Polo हॅचबॅकचं सेडान व्हर्जन आहे. Polo आणि Vento यांच्यातील दरी मिटवण्याच्या हेतूने ही कार कंपनीने तयार केली, बाजारात आणली. भारतीय कारप्रेमींच्या गरजा ओळखून ही कार तयार केल्याचा कंपनीचा दावा आहे. ती Made for India असल्याचं ते म्हणतात. डिझाइनचा विचार केल्यास, Ameo चं डिझेल व्हर्जन हे पेट्रोल व्हर्जनसारखंच आहे. समोरून ही कार 'शेम टू शेम' Polo सारखी दिसते. Volkswagen Ameo मध्ये स्मोक्ड हेडलॅम्प देण्यात आलाय. कारच्या पुढील बंपरवरील क्रोमचा वापर लक्षवेधी ठरतो आणि कार शाही दिसते. Ameo चं इंटिरिअरही अत्यंत नेटकं आहे. कारच्या केबिनचा दर्जा चांगला आहे. फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हीलमुळे ही कार आपल्याला स्पोर्टी फील देते. टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीममुळे आपलं काम सोपं होतं. ब्लू टूथ, टेलिफोनी, यूएसबी, AUX, एसडी कार्ड सपोर्ट, व्हॉइस कमांड आणि मिररलिंक या सुविधा कारमध्ये आहेत. मात्र, यात अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो हे फीचर्स नाहीत.रिअर एसी वेंट, इलेक्ट्रिकल अॅडजस्टेबल ORVM, हाइट अॅडजस्टेबल स्टिअरिंग व्हील आणि फ्रंट आर्म रेस्टमुळे इतर कारच्या तुलनेत Ameo सरस ठरते. पण इंटिरिअर स्पेसचा विचार केल्यास मागच्या सीटवर बसणाऱ्यांची थोडी अडचण होऊ शकते. पुढची सीट आरामदायक आहे. पण, मागच्या बाजूला लेगरूम, थाय सपोर्ट आणि हेड रूम पुरेशी नाही. लांबचा प्रवास असल्यास तिसऱ्या प्रवाशाला अगदीच आखडून बसावं लागू शकतं. Volkswagen Ameo TDI मध्ये क्रूज कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, रेन सेन्सिंग वायपर, वन टच अँटी पिंच पॉवर विंडो आणि क्लूड ग्लब बॉक्ससारखे फीचर्स आहेत. Volkswagen Ameo TDI DSG मध्ये 1.5 लीटर, 4-सिलिंडर डिझेल इंजिन आहे. Volkswagen Polo आणि Volkswagen Vento मध्येही याच इंजिनाचा वापर केला जातो. हे इंजिन 108 बीएचपी पॉवर आणि 250 Nm टॉर्क देते. त्यामुळे ही या सेग्मेंटमधील सगळ्यात पॉवरफुल्ल कार आहे. 7-स्पीड DSG किती उत्तम प्रकारे ट्यून केलंय हे कार चालवल्यावर लगेच कळतं. विशेष म्हणजे, भारतीयांसाठी कळीचा मुद्दा असलेला मायलेजचा निकषही ती पूर्ण करते. कारचा एकंदर परफॉर्मन्स आपल्याला खूश करेल. स्पोर्ट्स मोडच्या पर्यायामुळे तुम्ही ड्रायव्हिंगचा मनसोक्त आनंद लुटू शकता. या कारचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ही तिची सगळ्यात मोठी खासियत आहे. लोअर आरपीएममध्ये तुम्हाला काही उणिवा जाणवतील, पण 7-स्पीड DSG गिअरबॉक्स आपल्याला जराही निराश करणार नाही. कारमधील फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील दिसायला चांगलं आहे. कारचं स्टिअरिंग थोडं वजनदार आहे आणि सस्पेंशनही जड आहे.कारचं स्टेअरिंग थोडंसं जड असल्यानं गाडी रस्त्यावर पळवताना मज्जा येते. परंतु ट्रॅफिकमध्ये ही गाडी काहीशी त्रासदायक ठरू शकते. Volkswagen Ameoच्या सर्व प्रकारात एबीएस आणि ड्युअल एअरबॅगसारख्या सुविधांचाही समावेश आहे. तसेच कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलचं फीचर्स देण्यात आल्यानं तुम्हाला कार नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरते. Volkswagen Ameoची टक्कर Maruti Suzuki DZire, Ford Figo Aspire, Hyundai Xcent, Tata Tigor आणि Honda Amaze बरोबर आहे. Volkswagen Ameo TDI AT, Comfortline Plus आणि Highline प्रकारातही उपलब्ध आहे. दिल्लीत Comfortline Plus प्रकारातल्या कारची किंमत ऑन रोड जवळपास 10.20 लाख रुपयांएवढी आहे. तर Volkswagen Ameoमधल्या Highline प्रकारातील कारची किंमत 11.11 लाख रुपयांच्या आसपास आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी Volkswagenच्या गाड्या ओळखल्या जातात. Volkswagen Ameo TDI ही कार ग्राहकांच्या मागण्यांनुसार तयार करण्यात आली आहे. या कारचं डिझाइन आणि इंटीरिअर स्पेस इतर कारच्या तुलनेत कमी असला तरी परफॉर्मन्समध्ये ही गाडी जबरदस्त आहे. Volkswagen Ameo ऑटोमॅटिक गाडीतही 7 स्पीड DSGचा गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारमध्ये पॉवर, परफॉर्मन्स आणि मायलेजमध्ये ताळमेळ चांगला आला. त्यामुळे तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर Volkswagen Ameo ही कार तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.   

टॅग्स :Automobileवाहनcarकार