शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

Video : शेतकऱ्यांनो! वर्षाला 1.5 लाख रुपये वाचवा; देशाचा पहिला सीएनजी ट्रॅक्टर आला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 8:24 PM

CNG Tractor : हा सीएनजी गावागावात पोहोचलेला नसल्याने ग्रामीण भागात या ट्रॅक्टरला वापर होणे फारच अवघड आहे. तसेच जिथे सीएनजी आहे तिथे हा ट्रॅक्टर सीएनजी पंपावर ने-आण करणे देखील जिकीरीचे आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून आता शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टर, कार आणि बसेसनंतर आता सीएनजी बसविण्यात आलेले ट्रॅक्टरही रस्त्यावर आणि शेतात फिरताना दिसणार आहेत. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पहिला सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर लाँच केला आहे. फक्त हा सीएनजी गावागावात पोहोचलेला नसल्याने ग्रामीण भागात या ट्रॅक्टरला वापर होणे फारच अवघड आहे. तसेच जिथे सीएनजी आहे तिथे हा ट्रॅक्टर सीएनजी पंपावर ने-आण करणे देखील जिकीरीचे आहे. (Nitin Gadkari launched country's first CNG tractor.)

यावेळी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री व्ही.के. सिंह आणि राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला उपस्थित होते. यावेळी गडकरींनी देशातील शेतकरी या ट्रॅक्टरचा वापर करून दीड लाख रुपये वाचवू शकणार असल्याचे म्हटले आहे. शेतकरीडिझेलवर वर्षाला सरासरी 3 ते 3.5 लाख रुपये खर्च करतो. सीएनजीच्या वापराने तो हा खर्च दीड लाखांनी कमी करू शकणार आहे. डिझेलचा ट्रॅक्टरदेखील सीएनजीवर कन्वर्ट करता येणार आहे. याचेही फायदे आहेत, असे गडकरी म्हणाले. 

असे होतील फायदे..रावमेट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिली इंडियाद्वारे (Rawmatt Techno Solutions and Tomasetto Achille India) सीएनजी बसविण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा फायदा शेतकऱ्यांना होईल. आता सीएनजी ट्रॅक्टर आल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा आहे. सीएनजी एक स्वच्छ इंधन आहे, ज्यामुळे कार्बन आणि इतर प्रदूषित कण फार कमी उत्सर्जित होतात. नवीन तंत्रज्ञानाद्वारे रूपांतरित सीएनजी इंजिनचे आयुष्य पारंपारिक ट्रॅक्टरपेक्षा जास्त असेल. डिझेलच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टरचे मायलेज खूप जास्त असेल. एवढेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज चढ-उतार होत असतात, या तुलनेत सीएनजीच्या चढ-उतारांच्या किंमती खूप कमी असतात.

स्वस्त आहे सीएनजीपेट्रोल किंवा डिझेलपेक्षा सीएनजी खूप स्वस्त आहे. सीएनजी टँक टाइटपासून सील असल्यामुळे रिफ्यूलिंगच्यावेळी स्फोट होण्याचे प्रमाण कमी असते. वेस्ट टू वेल्थ म्हणजेच कचऱ्यापासून मौल्यवान वस्तू बनविण्याच्या पर्यायाला पुढे आणखी बळकटी मिळते. पेंढ्यांचा वापर बायो सीएनजी तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे केवळ शेतकऱ्यांचे उत्पन्नच वाढत नाही तर पेंढ्या जाळल्यामुळे होणारे प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल.

सीएनजी ट्रॅक्टरांमुळे असेही होतील फायदेकाही स्डटीनुसार, डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरांच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टर्संना जास्त पॉवर मिळते. डिझेलच्या तुलनेत सीएनजीपासून 70 टक्के कमी उत्सर्जन होते. सीएनजी ट्रॅक्टर वापरल्याने शेतकऱ्यांचा इंधन खर्च 50 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल. समजा, राजधानी दिल्लीत डिझेलची किंमत प्रतिलिटर 78.03 रुपये आहे, तर सीएनजी  42.70 रुपये प्रति किलो आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीFarmerशेतकरीDieselडिझेल