शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट वापरताय, सावधान...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 09:26 IST

वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी वाहतूक विभागाने कंबर कसली आहे.

ठळक मुद्देवापरणाऱ्यास व विक्रेत्यास दोन वर्षांची शिक्षा किंवा दोन लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली : वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी वर्षभरापूर्वीच दंडामध्ये जबर वाढ केलेली असताना आता आयएसआय मार्क नसणारी हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात वाहतूक विभागाने मोर्चा वळविला आहे. आयएसआय मार्क नसलेली हेल्मेट वापरल्यास व विक्री केल्यास दोन वर्षांची शिक्षा किंवा दोन लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. पुढील 60 दिवसांनंतर हा नवा  नियम लागू हाेणार आहे.रस्ते सुरक्षा अिभयानांतगर्त वाहतूक विभागाकडून नेहमीच हेल्मेट वापरण्यासंबंधी जागृती करण्यात येते. बऱ्याचदा हेल्मेट सक्तीही करण्यात आली आहे. मात्र, तरीही बरेच दुचाकीस्वार सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. वाहतूक पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी रस्त्याकडेला मिळणारी हलक्या दर्जाची हेल्मेट खरेदी करतात व वापरतात. या हेल्मेटमुळे अपघातावेळी कोणतेही संरक्षण मिळत नसल्याने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसुचना जारी केली आहे. यामध्ये अदखलपात्र गुन्हा आणि  दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच पुन्हा असा गुन्हा केल्यास वाढीव दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.  भारतात रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे सर्वाधिक मृत्यू होतात. यामुळे आयएसआय मार्क असलेली हेल्मेट दुचाकीस्वाराच्या डोक्यास सुरक्षा प्रदान करतात. मात्र, किंमत जास्त असल्याने आणि माहिती नसल्याने दुचाकीस्वार हलक्या दर्जाची हेल्मेट वापरतात. यामुळे अपघाती मृत्यू वाढत असल्याचे दुचाकी हेल्मेट उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजीव कपूर यांनी सांगितले.  सरकारी आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यामध्ये सर्वाधिक दुचाकीस्वार असतात. बनावट हेल्मेट विक्रीवर बंदी आणल्यास लाखो जीव वाचू शकतात. तसेच नागरिकांमध्ये दर्जेदार उत्पादने वापरण्याची वृत्ती वाढीला लागणार असल्याचे कपूर यांनी सांगितले.

टॅग्स :Automobileवाहनroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकRto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीस