शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चढ- उतारावरील पार्किंगसाठी करा हॅण्डब्रेकचा वापर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 08:00 IST

हॅण्डब्रेक हा कारचा विविध कामांसाठी उपयुक्त असणारा घटक आहे. पार्किंगच्यावेळी हॅण्डब्रेक लावणे गरजेचे आहे. केवळ गीयरवर वा इंजिन बंद करून कार पार्क केली झाले असे होत नाही, त्यासाठी हॅण्डब्रेकचा वापर हवाच

ठळक मुद्देहॅण्डब्रेकचा पार्किंगमधील हा वापर अतिशय गरजेचा असतोकधीही केवळ गीयरवर कार पार्क करू नयेत्यामुळे उतारावर असेल तर त्या गीयरवरही ताण येत असतोतो ताण कमी करण्यासाठीही हॅण्डब्रेकचा वापर हा गरजेचा ठरतो

कार वा वाहनांचा हॅण्डब्रेक हे एक अतिशय मोलाचे साधन आहे. कार चालवताना विविध वेळा त्याचा उपयोग होत असतो, हे खरे असले तरी केवळ कार चालवतानाच नव्हे तर पार्किंगच्यावेळीही हॅण्डब्रेक हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्याची पार्किंगच्या कामातील भूमिका ही अतिशय मोलाची असते. कारच्या हॅण्डब्रेकचा पार्किंगच्यावेळी वापरच न करणारे अनेक जण आहेत. केवळ गीयरमध्ये कार ठेवून पार्किंग करणारे काही लोक कार जेव्हा टो केली जाते, तेव्हा त्या गीयरचे नुकसान झाल्याचे अनुभवतात, गीयर ही सातत्याने कार चालवताना वापर करण्याची बाब आहे. त्यामुळे गीयरही नीट राहिला पाहिजे.

कार पार्किंग करताना उतारावर करीत असाल व उतार तुमच्या समोरच्या बाजूला असेल तरी व उतार मागील बाजूला असेल तरी केवळ गीयरवर टाकून कार पार्क करू नका. त्यासाठी हॅण्डब्रेक लावा. हॅण्डब्रेक हा ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला असतो. तो एका दट्ट्याद्वारे दिसून येतो.त्याच्या लीव्हरवर एक बटण असते ते आत अंगठ्याने दाबून पुश करून मग हॅण्डब्रेक खेचावा वा रिलीज करावा. या पद्धतीने न कलेयास हॅण्डब्रेक खऱाब होऊ शकतो. वाहन सपाट रस्त्यावरही पार्क केलेली असले तरी कारला हॅण्डब्रेक लावणे गरजेचे आहे.

कार उतारावर पार्क करताना पुढील बाजू उताराच्या दिशेने असेल म्हणजे ड्रायव्हरच्या तोंडासमोर उतार असेल तर कार पार्क करताना ती इंजिन बंद केल्यानंतर रिव्हर्स गीयरमध्ये टाकून व नंतर लगेच हॅण्डब्रेक खेचून घेऊन पार्क करा. त्यामुळे कार कोणत्याही स्थितीत पुढील बाजूला पुश देशील होणार नाही. उतारामध्ये मागील बाजूने उतार असेल तर कार पार्क करताना इंजिन बंद केल्यानंतर कार पहिल्या गीयरमध्ये टाकून हॅण्डब्रेक खेचून घेऊन पार्क करा. अशा प्रकारामुळे कार सुरक्षितपणे पार्क झाली असले असे निश्चित समजावे.

हॅण्डब्रेकचा पार्किंगमधील हा वापर अतिशय गरजेचा असतो. कधीही केवळ गीयरवर कार पार्क करू नये. त्यामुळे उतारावर असेल तर त्या गीयरवरही ताण येत असतो. तो ताण कमी करण्यासाठीही हॅण्डब्रेकचा वापर हा गरजेचा ठरतो. हॅण्डब्रेक लावून बराच काळही कार पार्क करू नये. तो नेहमी रिलीज करून गाडी थोडी पुढे मागे घेत राहावे. तसे केल्याने हॅण्डब्रेक वापरताही राहील व कार बराच काळ बंद असल्यास तो जामही होणार नाही. तो वापरता राहील. हॅण्ड ब्रेक हा कार चालवताना किती महत्त्वाचा व उपयुक्त असतो तो पुढील लेखामध्ये पाहू.

 

टॅग्स :carकारAutomobileवाहन