शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

'टाटा' नाम तो सुना ही होगा! सज्ज व्हा येतेय Tata Blackbird SUV; लॉन्चआधीच फिचर्स लिक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 17:42 IST

टाटा मोटर्स एका नव्या कारवर काम करत आहे. ही एक SUV सेगमेंट कार असेल आणि Hyundai Creta आणि Kia Seltos या कारशी स्पर्धा करेल.

टाटा मोटर्स एका नव्या कारवर काम करत आहे. ही एक SUV सेगमेंट कार असेल आणि Hyundai Creta आणि Kia Seltos या कारशी स्पर्धा करेल. टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्ही असे या टाटाच्या आगामी कारचे नाव असणार आहे. टाटाची ही अत्याधुनिक कार टाटा नेक्सॉन आणि टाटा हॅरियरमध्ये फिट होईल. टाटाच्या या आगामी SUV कारमध्ये अनेक उत्तम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतील. टाटाच्या नेक्सॉन प्रमाणे ती जागतिक सुरक्षा रेटिंगमध्ये सर्वोत्तम गुण प्राप्त करू शकते. 

टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्हीच्या (Tata Blackbird SUV) डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर या कारची लांबी ४.२ मीटर असू शकते. हे पहिलं AMP उत्पादन असेल, ज्याची लांबी ४००० AMP पेक्षा जास्त नसेल. तसंच ICE इंजिन असलेल्या कारला कमीत कमी GST भरावा लागेल. या कारचे डिझाईन टाटा नेक्सन आणि हॅरियर यांच्यापासून प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये डीआरएलही पाहता येणार असून आकर्षक बंपर असणार आहे.

Tata Blackbird SUV चे संभाव्य इंटिरियरसमोर आलेल्या माहितीनुसार कारमध्ये फ्री स्टँडिंग टच स्क्रीन मिळेल. ते मध्यभागी सेट केले जाईल. यात टू स्पोक स्टिअरिंग व्हील मिळेल. याशिवाय सनरूफचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे. १०-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करेल. 

Tata Blackbird SUV चे संभाव्य इंजिनTata Blackbird SUV च्या इंजिनबद्दल माहिती समोर आली आहे की या कारला १.२ लीटर थ्री सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल, जे १३० bhp पावर आणि १७८ Nm टॉर्क जनरेट करू शकेल. याशिवाय, दुसरा इंजिन पर्याय १.५ लिटर चार सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल असेल. जो ११८ bhp पावर आणि २७० Nm टॉर्क जनरेट करू शकतो.

Tata Blackbird SUV ची इतर वैशिष्ट्येटाटा ब्लॅकबर्ड एसयूव्हीच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर कारमध्ये वायफाय असेल. वायरलेस चार्जर सपोर्ट असेल. सनरूफ आणि ऑटोमेटेड टेंपरेचर कंट्रोल अशी वैशिष्ट्ये देखील असतील. तसेच कूल्ड ग्लव बॉक्सही दिला जाईल. कंपनीकडून रियर व्ह्यू कॅमेरा देखील उपलब्ध असेल.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन