शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Upcoming SUVs : भारतात लवकरच येणार 'या' पॉवरफूल SUV आणि MPV कार, तुम्हाला कोणती आवडेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 09:47 IST

Upcoming New Cars : जर तुम्ही नवीन SUV कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही काही येत्या काळात लाँच होणाऱ्या कारचाही विचार करू शकता.

नवी दिल्ली : सध्या देशात SUV आणि MPV कारना प्रचंड मागणी आहे, त्यामुळे या सेगमेंटमध्ये जास्तीत जास्त मॉडेल्स लाँच केले जातात. या क्रमाने येत्या काही महिन्यांत अनेक नवीन कार लवकरच बाजारात दाखल होणार आहेत. यामध्ये महिंद्रा, टोयोटा आणि एमजीसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. जर तुम्ही नवीन SUV कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही काही येत्या काळात लाँच होणाऱ्या कारचाही विचार करू शकता. या कारची संपूर्ण यादी पहा.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross) टोयोटा मोटर्स लवकरच आपल्या नवीन MPV कार इनोव्हा हायक्रॉस देशात लाँच करू शकते. कंपनीने या नवीन कारचा सिल्हूट लुक सादर केला आहे. टोयोटा कंपनी ही नवीन MPV त्यांच्या जागतिक TNGA-C प्लॅटफॉर्मवर तयार करणार आहे.

फोर्स गुरखा 5 डोअर (Force Gurkha 5 Door)फोर्स मोटर्स लवकरच आपल्या  3 Door मॉडेलच्या गुरखाचे 5 Door व्हर्जन देशात आणू शकते. या कारची डिझाइन सध्याच्या SUV सारखीच असण्याची अपेक्षा आहे. या कारला 2.6-लिटर कॉमन रेल टर्बो इंजिन मिळेल, जे 90 bhp पॉवर आणि 250 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. यासोबतच या कारमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्सही मिळणार आहे.

महिंद्रा बोलेरो निओ प्लस (Mahindra Bolero Neo Plus)महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच त्यांची नवीन बोलेरो निओ प्लस एसयूव्ही 7 आणि 9 सीटर व्हर्जनमध्ये लॉन्च करू शकते. कार सध्याच्या 2.2L mHawk डिझेल इंजिनद्वारे चालविली जाईल, जी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्ससह ऑफर केली जाईल. यासोबतच अनेक फीचर्स अपडेट्स मिळण्याची अपेक्षा आहे.

सिट्रोएन सी 3 एमपीवी (Citroen C3-7-seater MPV)Citroën मधील ही नवीन MPV देशात चाचणी दरम्यान अनेक वेळा पाहिली गेली आहे. नवीन 7-सीटर MPV ला 16-इंच अलॉय व्हील मिळतील, ज्यामुळे अधिक ग्राउंड क्लिअरन्स मिळण्याची अपेक्षा आहे. या कारचा लुक आणि इंटीरियर सध्याच्या Citroën C3 प्रमाणे असेल.

टॅग्स :carकारAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग