शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

Upcoming Cars: आता होणार खरी फाइट! Tata आणणार दोन नव्या कार, Brezza आणि Baleno CNG ला देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 16:25 IST

Tata Motors Upcoming Cars: इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स शिवाय, कंपनी आपल्या लोकप्रिय मॉडल्सचे सीएनजी व्हर्जनही आणणार आहे. यात अल्ट्रोज सीएनजी, पंच सीएनजी आणि नेक्सन सीएनजीचा समावेश असेल.

टाटा मोटर्सने (Tata Motors) भारतीय बाजारात कारचे अनेक नवे मॉडेल्स (ईव्ही आणि सीएनजी व्हर्जनसह) लॉन्च करण्याची योजना आखली आहे. लिथियम-आयन बॅटरी आणि BEV तंत्रज्ञानाच्या स्थानिक उत्पादनासाठी कंपनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स शिवाय, कंपनी आपल्या लोकप्रिय मॉडल्सचे सीएनजी व्हर्जनही आणणार आहे. यात अल्ट्रोज सीएनजी, पंच सीएनजी आणि नेक्सन सीएनजीचा समावेश असेल. Tata Altroz ​​​​CNG आणि Nexon CNG या पूर्वीच टेस्टिंग दरम्यान दिसून आली आहे.

Tata Altroz ​​​​CNG देणार Baleno CNG ला टक्कर -मात्र, आद्याप कंपनीकडून मॉडलच्या लॉन्च टाइमलाइन संदर्भात कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. लॉन्चनंतर, Tata Altroz ​​​​CNG चा सामना लवकरच लॉन्च होणाऱ्या  Maruti Baleno CNG आणि Toytoa Glanza CNG सोबत असेल. हॅचबॅकमध्ये सीएनजी किटसह 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल. पेट्रोलवर ही कार 110bhp पॉवर आणि 140Nm टार्क जनरेट करण्यात सक्षम असू शकते. तसेच, ​​CNG वर ही थोडी कमी पॉवर आणि कमी टॉर्क जनरेट करेल.

टाटा नेक्सन सीएनजी मारुती ब्रेझा सीएनजीला देईल टक्कर -टाटा नेक्सन सीएनजी थेट मारुती ब्रेझा सीएनजीला टक्कर देईल. ही कार 2023 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. या मॉडेलमध्ये 1.2 रेव्होट्रॉन टर्बो पेट्रोल इंजिनसह फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट मिळू शकते. स्टँडर्ड मॉडेलमध्ये पेट्रोल युनिट 120bhp पॉवर आणि 170Nm टार्क जनरेट करते. Nexon CNG च्या रेग्युलर पेट्रोल व्हर्जनच्या तुलनेत, ही सीएनजीवर 15bhp कमी पॉवरफुल असू शकते. ही कार 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येऊ शकते. Tata Altroz ​​​​CNG आणि Nexon CNG, दोन्ही आपल्या स्टॅन्डर्ड पेट्रोल व्हर्जनच्या तुलनेत अधिक फ्यूअल एफिशिअन्ट असतील.

टॅग्स :TataटाटाMarutiमारुतीcarकार