शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

Hyundai Creta चा बँड वाजणार! या 3 SUV धमाका करणार, पुढच्या महिन्यात होणार लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 12:21 PM

3 जबरदस्त मीड साइज एसयूव्ही क्रेटाला टक्कर देण्यासाठी येत आहेत.

भारतीय कार बाजारात मिड साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये झपाट्याने वाढत आहे. यासेगमेंटमध्ये सध्या ह्युंदाई क्रेटाची सर्वाधिक विक्री होत आहे. मात्र, लवकरच क्रेटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण 3 जबरदस्त मीड साइज एसयूव्ही क्रेटाला टक्कर देण्यासाठी येत आहेत. Honda, Kia आणि Citroen सारख्या कंपन्या त्यांचे प्रोडक्ट लवकच बाजारात उतरवत आहेत. महत्वाचे म्हणजे, जुलै महिन्यातच या 3 पैकी 2 कार लॉन्च होत आहेत.

Kia Seltos facelift –पुढील महिन्यात सेल्टोसचे फेसलिफ्ट मॉडल येत आहे. महत्वाचे म्हणजे, या मिड साईज SUV ची अनौपचारिक बुकिंग काही निवडक डीलरशिप्सवर सुरू झाली आहे. सेल्टॉस फेसलिफ्टमध्ये एक ट्विक्ड एक्स्टीरिअर डिझाइन, पॅनोरामिक सनरूफ, डॅशबोर्डवर एक ट्विन डिस्प्ले सेटअप, डुअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा आणि पॉवर्ड टेलगेट मिळू शकते. यात ADAS ची सुविधाही मिळू शकते.

Honda Elevate – Honda Cars ने नुकतेच Creta आणि Grand Vitara ला टक्कर देण्यासाठी मिड साइज एसयूव्ही Honda Elevate सादर केली आहे. हे मॉडेल पुढील महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. सध्या काही डीलर्सकडे अनऑफिशियल बुकिंगदेखील सुरू आहे. होंडा एलीव्हेटसोबत सिक्स-स्पीड मॅन्युअल युनिट आणि सीव्हीटी युनिटसह 1.5-लिटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. यात 10.25 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, 7 इंचांचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि एका वायरलेस चार्जर सारखे फीचर्स असतील.

Citroen C3 Aircross – Citroen ने याच वर्षी एप्रिल महिन्यात भारतीय बाजारासाठी C3 Aircross वरून पडदा उचलला. सी3 हॅचबॅकवर आधारित सेव्हन सीटर एसयूव्हीच्या किंमतीची घोषणा यावर्षीच्या अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. C3 एअरक्रॉसमध्ये एक 1.2-लिटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन असेल. जे केवळ सिक्स-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनच्या माध्यमाने चाकांना शक्ती प्रदान करेल. या मोटारचे पॉवर आउटपुट 109bhp आणि 190Nm टार्क असेल. 

टॅग्स :AutomobileवाहनHyundaiह्युंदाईKia Motars Carsकिया मोटर्सHondaहोंडाcarकार