शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

'या' भारतीय कंपनीने आणली 5.60 लाखांची इलेक्ट्रिक बाईक, टॉप स्पीड 150 किमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 2:27 PM

नवीन अल्ट्राव्हॉयलेट F77 स्पेस एडिशन बाईक अनेक युनिक एलिमेंट्ससह मिळणार आहे.

नवी दिल्ली : भारतातील प्रिमियम इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक अल्ट्राव्हॉयलेटने F77 इलेक्ट्रिक बाईकचे नवीन स्पेशल 'स्पेस एडिशन' लाँच केले आहे. नवीन मॉडेल टॉप व्हेरिएंट म्हणून बाजारात आणण्यात आले आहे. बाईकची किंमत 5.60 लाख रुपये आहे. नवीन अल्ट्राव्हॉयलेट F77 स्पेस एडिशन बाईक F77 रेकॉन बाईकपेक्षा सुमारे 95,000 रुपये महाग आहे. नवीन अल्ट्राव्हॉयलेट F77 स्पेस एडिशन बाईक अनेक युनिक एलिमेंट्ससह मिळणार आहे.

नवीन एडिशनचे उत्पादन केवळ 10 युनिट्सपर्यंत मर्यादित आहे. नवीन स्पेस एडिशन बाईक एका विशेष पांढर्‍या पेंट स्कीमसह आली आहे, ज्याबद्दल अल्ट्राव्हॉयलेट कंपनीचा दावा आहे की, 'ड्रॅगला कमी करून एफिशिएंसीमध्ये योगदान देते'. कंपनीने बाईकवर अनेक ठिकाणी स्पेशल एडिशनचे बॅजिंग दिले आहे. नवीन बाईकच्या चार्जिंग पोर्ट फ्लॅपवर नंबर लिहिलेले असतील.

अल्ट्राव्हॉयलेट इंडियाने F77 स्पेस एडिशनमध्ये नवीन टँक ग्राफिक्स आणि नवीन एरोडायनामिक व्हील कव्हर देखील जोडले आहेत. बाईकची चावी एरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियमचा सिंगल ब्लॉक वापरून तयार केला आहे. तसेच, या बाईकसाठी Pirelli Diablo Rosso II रबर टायर्स देण्यात आले आहेत. तर स्टँडर्ड मॉडेलला एमआरएफ स्टील ब्रेस टायर्स येतात. 

बॅटरी, रेंज आणि मोटरस्पेस एडिशनला 10.3kWh बॅटरी पॅक मिळेल, जो सिंगल चार्जवर 307 किमीची रेंज देईल. रेंजचे आकडे F77 च्या टॉप-स्पेक रिकॉन व्हेरिएंटसारखेच आहेत. मात्र, इलेक्ट्रिक मोटरचे पीक आउटपुट आकडे वेगळे आहेत.  F77 स्पेस एडिशन 40.5hp आणि 100Nm जनरेट करते, जे F77 च्या लिमिटेड एडिशन व्हेरिएंट (किंमत 5.50 लाख रुपये) प्रमाणेच आहे. या बाईकचा टॉप स्पीड सुमारे 150KM आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनbikeबाईक