शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

TVS ने लॉन्च केली स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 21:14 IST

TVS Electric Scooter: या स्कूटरमध्ये 5-इंच TFT स्क्रीन, 950W चार्जर, क्रॅश अलर्ट, टो अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसारखे फिचर्स मिळतील.

TVS iQube New Base Variant : भारतातील आघाडीची टू-व्हिलर ऑटोमोबाईल कंपनी TVS ने आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर iQube चे नवीन बेस व्हेरियंट लॉन्च केले आहे. नवीन व्हेरिएंट लहान 2.2 kWh बॅटरी पॅकने सुसज्ज असून, त्याची किंमत 94,999 रुपये (एक्स-शोरुम) ठेवण्यात आली आहे. या EV स्कूटरच्या इतर व्हेरियंट्सची किंमत यापेक्षा जास्त आहे. 

फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्सनवीन बेस व्हेरियंटमध्ये 4.4kW हब-माउंटेड BLDC मोटर आहे, जी 140Nm टॉर्क जनरेट करते. ही मोटर 2.2 kWh बॅटरीमधून पॉवर घेते. ही बॅटरी इको मोडमध्ये 75 किमी आणि पॉवर मोडमध्ये 60 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. फास्ट चार्जरद्वारे याची बॅटरी 2 तासात 0 ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते. हे नवीन व्हेरिएंट दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात वॉलनट ब्राऊन आणि पर्ल व्हाइट रंग मिळतील.

या बेस व्हेरियंटची किंमत 94,999 रुपये आहे (एक्स-शोरूम, बंगळुरू), ज्यामध्ये EMPS सबसिडी आणि कॅशबॅक सामील आहे. ही किंमत फक्त 30 जून 2024 पर्यंत लागू असेल. स्कूटरच्या इतर फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, बेस व्हेरिएंटमध्ये 5-इंच TFT स्क्रीन, 950W चार्जर, क्रॅश अलर्ट, टो अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, 30 लीटर स्टोरेज मिळते.

या iQube स्कूटरचे ST मॉडेल दोन बॅटरी पॅकसह येते, ज्यात 3.4kWh आणि 5.1kWh चा समावेश आहे. त्याच्या 3.4kWh व्हेरिएंटची किंमत 1.55 लाख रुपये (एक्स-शोरुम, बंगळुरू) आणि 5.1kWh व्हेरिएंटची किंमत 1.85 लाख रुपये (एक्स-शोरुम, बंगळुरू) आहे.

त्याचे 3.4kWh बॅटरी व्हेरिएंट सिंगल चार्जवर 100km ची रेंज आणि 78 kmph चा टॉप स्पीड देते. तर, 5.1kWh बॅटरी व्हेरिएंट सिंगल चार्जवर 150km ची रेंज आणि 82km प्रति तासाचा टॉप स्पीड देऊ शकते.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर