शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक, टेम्पोमधून प्रवास करताय? अपघातानंतर एक छदामही मिळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 17:47 IST

रस्ते अपघातात प्राण गमावल्यास विमा कंपन्यांनी 10 लाख-15 लाखांची भरपाई दिल्याची किंवा न्यायालयाने त्यांना देण्यास लावल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो.

मद्रास : रस्ते अपघातात प्राण गमावल्यास विमा कंपन्यांनी 10 लाख-15 लाखांची भरपाई दिल्याची किंवा न्यायालयाने त्यांना देण्यास लावल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच एक असा निर्णय दिला आहे, ज्याद्वारे केवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रवाशांच्या नातोवाईकांनाच विम्याची भरपाई मिळू शकणार आहे. 

बऱ्याचदा विमा कंपन्या मृत्यू किंवा जखमी झाल्यानंतर विम्याची रक्कम देणे नाकारतात. यामुळे अशी प्रकरणे न्यायालयात जातात. यावेळी न्यायालये या कंपन्यांना विम्याची रक्कम देण्याचे आदेश देतात. मात्र, मद्रास न्यायालयात आलेल्या खटला काहीसा विचार करायला लावणारा आहे. माल वाहतूक करणाऱ्या वाहनामधून प्रवास करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारे माल वाहतूक करणाऱ्य़ा वाहनातून प्रवास करतेवेळी अपघातात मृत्यू किंवा जखमी झाल्यास ती व्यक्ती विम्याची रक्कम मिळण्यास पात्र राहत नसल्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

हा निर्णय बेंगळुरुच्या भारती AXA जनरल इन्शुरन्स कंपनीच्या बाजुने देण्यात आला. मोटर अॅक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलने या व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई देण्याचे आदेश दिले होते. या विरोधात कंपनी उच्च न्यायालयात गेली होती. 

घटना काय होती?1 सप्टेंबर 2011 मध्ये एका मालवाहतूक वाहनामधून 16 जण तामिळनाडूच्या  कोटापट्टी गावाहून सोलानकुरुचीला जात होते. यावेळी वाहनाला अपघात झाला. यामध्ये काही जण ठार झाले तर काही जखमी झाले. त्यांच्या कुटुंबियांनी  मोटर अॅक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलकडे धाव घेत भरपाई मिळण्याची मागणी केली. ती मान्य करत कंपनीला ट्रिब्युनलने भरपाई देण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAccidentअपघातroad transportरस्ते वाहतूक