शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या तासांत 80 टक्के चार्ज, 500Kms ची रेंज; Toyota नं लाँच केली Electric SUV; पाहा फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 16:49 IST

Toyota Electric Car launch :  कंपनीनं नुकतीच लाँच केली आपली पहिली इलेक्ट्रीक कार Toyota bZ4X.

टोयोटाने नुकतीच त्यांची पहिली ऑल-इलेक्ट्रीक SUV Toyota bZ4X सादर केली. विशेष बाब म्हणजे ही SUV 500 किमी पर्यंतच्या रेंजसह येते आणि अर्ध्या तासात 80 टक्के चार्जही होते. हे कंपनीचे bZ सीरिजचे पहिलेच मॉडेल आहे. पुढील कालावधीत कंपनी आणखीही मॉडेल्स लाँच करणार आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार bZ चा अर्थ beyond Zero असा असून तो कार्बन न्यूट्रॅलिटीकडे टोयोटाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतो. 

या इलेक्ट्रीक एसयूव्हीचा प्लॅटफॉर्म कंपनीने जपानच्या सुबारू कॉर्पोरेशनच्या सहकार्याने विकसित केला आहे. हे प्लॅटफॉर्म इलेक्ट्रीक SUV ला ऑफ-रोडिंग कार्यक्षमतेची क्षमता देखील देते. आपल्याला एक असं इलेक्ट्रीक वाहन विकसित करायचं आहे जे अनेक वर्षांपर्यंत विशेषकरून थंडीच्या महिन्यांमध्ये सुरक्षितरित्या चालवलं जाऊ शकतं. या शिवाय ते टॉप क्लास कॅपॅसिटीसोबत येत असेल, असं टोयोटानं सांगितलं.

500KM ची रेंजनव्या EV मध्ये 71.4 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. रेंजच्या बाबतीत सांगायचं झालं तर या कारचं फ्रंट-व्हील-ड्राइव्ह व्हर्जन 500 किमी देते आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह व्हर्जन 460 किमीची रेंज देते, असा दावा टोयोटाने केला आहे. पहिलं व्हर्जन 150 kW मोटरला सपोर्ट करते, तर दुसऱ्या मॉडेलवर प्रत्येक एक्सलवर 80 kW मोटर्स बसवलेल्या आहेत. ही कार सर्व हाय आऊटपूट चार्जर्सला सपोर्ट करत असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. 150 किलोवॅट डायरेक्ट करंट क्षमतेसह 30 मिनिटांत ही कार 80 टक्के चार्ज करता येते.

डिझाईनच्या बाबतीत, Toyota bZX4 EV ही मीडियम साईज SUV आहे. ही एसयुव्ही मॉडर्न एक्सटिरिअरसह येते. इंटिरिअरबद्दल सांगायचं झालं तर नॉर्मल स्टेअरिंग आणि विंग शेप स्टेअरिंगमधून कोणतंही एक निवडण्याचा पर्यायही मिळतो. यामुळे ड्राईव्ह करताना चांगला अनुभव मिळतो असा दावा कंपनीनं केला आहे. कंपनी 2025 पर्यंत bZ सीरिजमधील आणखी 7 मॉडेल आणू शकते.

टॅग्स :ToyotaटोयोटाElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन