भारतीय बाजारपेठेत गेल्या काही महिन्यांपासून टोयोटाचा जबरदस्त बिझनेस सुरू आहे. टोयोटाच्याकारची मागणी एवढी वाढली आहे की, प्रतीक्षा यादी देखील काही महिन्यांपर्यंत वाढली आहे. एकीकडे, कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इनोव्हा हायक्रॉस आणि अर्बन क्रूझर हायराइडरच्या विक्रीचा ग्राफ वाढला आहे, तर दुसरीकडे, कंपनीच्या पोर्टफोलिओतील सर्वात आलिशान कार, वेलफायरच्या मागणीतही अचानक वाढ झाली आहे. ही तिची या वर्षातील दुसरी, तर गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी वाढ आहे. महत्वाचे म्हणजे, या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १.२० कोटी रुपये एवढी आहे.
टोयोटा वेलफायर सेल्स 2025महीना - यूनिटजानेवारी - ३फेब्रुवारी - १९मार्च - ३४६एप्रिल - २०मे - २९जून - १५६जुलै - १८०
टोयोटा वेलफायरचे फीचर्स स्पेसिफिकेशंस -टोयोटा वेलफायरमध्ये स्ट्रॉन्ग हायब्रिड मॉडेलमध्ये 2.5-लिटर इनलाइन चार-सिलिंडर डीओएचसी इंजिन देण्यात आले आहे. जे जास्तीत जास्त 142 किलोवॅट पॉवर आउटपुट आणि 240 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन इलेक्ट्रिक मोटर आणि हायब्रिड बॅटरीला डोडण्यात आले आहे. यामुळे उत्सर्जन कमी होते. सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉन्ग हायब्रिड इलेक्ट्रिक मॉडेलला झिरो उत्सर्जन मोडवर 40% अंतर आणि 60% वेळेपर्यंत चालण्यास सक्षम मानले जाते. ही कार 19.28 किमी. प्रति लीटरचे मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे.
आत एक लांब ओव्हरहेड कन्सोल आहे, जे छताच्या मध्यभागी बसवला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी त्यात अनेक नियंत्रणे देण्यात आली आहेत. यात १५ जेबीएल स्पीकर्स, अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कॉम्पॅटिबिलिटीसह १४-इंचांचे इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. या कारमध्ये ऑटोमॅटिक मूनरूफ शेड्ससह पुल-डाउन साइड सन ब्लाइंड्स आहेत, जे छतावरून अधिक सूर्यप्रकाश येऊ देत नाहीत. दुसऱ्या रांगेतील सीट्सना मसाज फंक्शन तसेच प्री-सेट मोड देखील मिळतो.
या कारमध्ये, रिमोट डोर लॉक/अनलॉक, एअर कंडीशनिंग, इमरजंन्सी सर्व्हिस, व्हेइकल डायग्नोस्टिक्स, ड्रायव्हर मॉनिटरिंग अलर्ट सारखे 60 हून अधिक कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. टोयोटाचे हे मॉडेल सेफ्टीच्या दृष्टीने अॅडव्हॉन्स ड्रायव्हर असिस्टंन्ट सिस्टिम (ADAS) सारख्या फीचर्सने सुसज्ज आहे. याशिवाय या कारमध्ये इतरही अनेक लक्झरिअस फीचर्स देणण्यात आले आहेत.