डिझेलवर चालणाऱ्या 'या' गाड्यांना म्हटले जाऊ शकते बाय-बाय, पाहा लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 12:00 PM2022-10-23T12:00:37+5:302022-10-23T12:05:59+5:30

Diesel Cars : कार निर्माता कंपनी ह्युंदाई देखील आपल्या काही डिझेल कारचे उत्पादन थांबवणार आहे.

these diesel cars to be discontinued from 2023 see the list | डिझेलवर चालणाऱ्या 'या' गाड्यांना म्हटले जाऊ शकते बाय-बाय, पाहा लिस्ट...

डिझेलवर चालणाऱ्या 'या' गाड्यांना म्हटले जाऊ शकते बाय-बाय, पाहा लिस्ट...

Next

नवी दिल्ली : मारुती आणि फोक्सवॅगनने भारतात आपल्या डिझेल कार बनवणे बंद केले आहे, आता इतर कंपन्या देखील आपल्या कार बंद करण्याचा विचार करत आहेत. होंडा आणि ह्युंदाई देखील लवकरच या कार निर्मात्यांमध्ये सामील होऊ शकतात. अमेझ ते ह्युंदाई i20 सारख्या या कंपन्यांच्या कार या रेंजमध्ये येऊ शकतात.

होंडा सिटी
अलीकडेच, कंपनीने आपली होंडा सिटी सेडान कार हायब्रिड पेट्रोल इंजिनसह अपडेट केली आहे, आता कंपनी या कारचे डिझेल इंजिन व्हेरिएंट बंद करण्याचा विचार करत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत या कारचे डिझेल व्हेरिएंट बंद करू शकते. सध्या ही कार 1.5-L डिझेल इंजिनसह येते, जी 97.89hp पॉवर आणि 200Nm पीक टॉर्क जनरेट करते, तर कारचे 1.5-L पेट्रोल इंजिन 119.35hp पॉवर आणि 145Nm टॉर्क जनरेट करते.

होंडा अमेझ
कंपनी या सेडान कारचे डिझेल मॉडेलही बंद करणार आहे. या कारच्या डिझाईनबद्दल सांगायचे तर यामध्ये स्लोपिंग रूफ, एलईडी हेडलाइट्स आणि 15-इंच मिक्स्ड मेटलचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत, तर केबिनमध्ये दोन एअरबॅग, पाच सीट आणि 7.0 एक इंच इन्फोटेनमेंट पॅनल आहे. या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यात 1.5-L डिझेल इंजिन दिले आहे, जे 79.12hp पॉवर, 160Nm टॉर्क आणि 1.2-L पेट्रोल इंजिन 88.5hp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करते.

होंडा WR-V
ही कार सध्या आपल्या सेफ्टी रेटिंगमुळे जगभरात चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला फक्त एक स्टार देण्यात आला आहे पण भारतात या कारला प्रचंड मागणी आहे. पुढील वर्षी एप्रिल 2023 पूर्वी होंडा या कारच्या डिझेल मॉडेलचे उत्पादन बंद करणार आहे, त्यानंतर ही कार फक्त पेट्रोल इंजिनसह उपलब्ध होईल.

ह्युंदाई i20
कार निर्माता कंपनी ह्युंदाई देखील आपल्या काही डिझेल कारचे उत्पादन थांबवणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी या वर्षाच्या अखेरीस आपल्या डिझेल कार ह्युंदाई i20 चे उत्पादन थांबवणार आहे. यानंतर ही कार केवळ 1.0 L TGDi टर्बो-पेट्रोल इंजिनसह येईल, जी 118hp पॉवर आणि 172Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.

Web Title: these diesel cars to be discontinued from 2023 see the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.