शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

चीनमध्ये केवळ 1 टक्केच इलेक्ट्रिक कार स्टार्टअप उरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 09:12 IST

तंत्रज्ञान, निधीची कमतरता आणि सध्या अमेरिकेसोबत सुरु असलेले व्यापार युद्ध यामुळे या कंपन्या मेटाकुटीस

ब्लूमबर्ग  : स्टार्टअप कंपन्यांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या चीनमध्ये इलेक्ट्रिक कार बनविणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांना अस्तित्व टिकविण्यासाठी झगडावे लागत आहे. तंत्रज्ञान, निधीची कमतरता आणि सध्या अमेरिकेसोबत सुरु असलेले व्यापार युद्ध यामुळे या कंपन्या मेटाकुटीस आल्या असून केवळ 1 टक्केच कंपन्यांनी तग धरला आहे.  चीनमध्ये प्रदुषणाची पातळी कमालीची वाढली आहे. यामुळे सरकारनेइलेक्ट्रिक कार बनविण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. जागतिक दर्जाच्या कंपन्यांनी अद्याप आपल्या इलेक्ट्रिक कार चीनच्या बाजारात म्हणाव्या त्या प्रमाणात उतरविलेल्या नाहीत. यामुळे उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या चीनमध्ये शेकडोंच्या संख्येने स्टार्टअप उभे राहिले होते. मात्र, या कंपन्यामध्ये संशोधनाचे पहिले पाऊलच अडखळले आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली आहे. शांघायमध्ये मुख्यालय असलेल्या एका गुंतवणूक कंपनीने 15 दशलक्ष डॉलर एवढी मोठी रक्कम काही स्टार्टअप आणि कार निर्मात्या कंपन्यांशी भागीदारी करत गुंतवली आहे. ही प्रक्रिया अत्यंत जटील आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि कार निर्मितीसाठी लागणारे मनुष्यबळ यामुळे या कंपन्या मेटाकुटीला आल्या असल्याचे या कंपनीचे गुंतवणूक अधिकारी इयान झू यांनी सांगितले. तसेच चीनमधील जुन्या कंपन्यांशी या कंपन्य़ांना स्पर्धा करावी लागत आहे. बऱ्याच कंपन्यांनी अद्याप उत्पादन सुरु केलेले नसले तरीही मोठ्या प्रमाणावर मागणी पूर्ण करणे या कंपन्यांच्या आवाक्यात नाही. यापूर्वी चीनने जागतिक स्तरावरील टेस्ला, बीएमड्ब्ल्यू एजी या कंपन्यांना चीनमध्ये इलेक्ट्रिक कार विक्रीस परवानगी दिलेली आहे. मात्र, या कंपन्याही अपेक्षेप्रमाणे विक्री करू शकलेल्या नाहीत, असेही झू यांनी सांगितले. अमेरिकेशी सुरु असलेले व्यापार युद्धही याला कारणीभूत आहे. जर हे असेच सुरु राहिले तर या कार सर्वसामान्यांना घेणे परवडणारे नसेल. कारण, यात वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आणि संशोधन खुपच खर्चिक आहे. 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनchinaचीनAmericaअमेरिकाcarकार