रंग तर बरेच आहेत पण... भारतात सफेद रंगाचीच कार का खरेदी करतात लोक, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 16:40 IST2023-02-24T16:40:03+5:302023-02-24T16:40:14+5:30

नवीन कार घेताना लोक याचा विचार करतातच. रंगांमध्ये सर्वात रंगीत रंगासाठी लोकांची सर्वाधिक पसंद निळा रंग आहे.

There are many colors but... why people buy only white car in India, know reasons | रंग तर बरेच आहेत पण... भारतात सफेद रंगाचीच कार का खरेदी करतात लोक, जाणून घ्या कारण...

रंग तर बरेच आहेत पण... भारतात सफेद रंगाचीच कार का खरेदी करतात लोक, जाणून घ्या कारण...

रंगाबाबत प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. अनेकांना लाल आवडतो, अनेकांना निळा, अनेकांना पांढरा. सध्या मिश्र संमिश्र रंगातही वाहने उपलब्ध असतात. परंतू रंगाची आवड वेगळी असली तरी बरेचजण पांढऱ्या रंगाचीच कार विकत घेतात. या लोकांना पांढरा रंग का आवडत असेल बरे? 

तुम्ही कधी शोरुमला गेलात तर तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या कारचा अमुक एवढे वेटिंग आणि लाल किंवा अन्य रंगाची कार तुम्हीला लगेच मिळेल असे सांगितले जाते. असे का? कार कंपन्यांना काही सेल करायचा नसतो का? भारतात बहुतांश लोक पांढऱ्या रंगाच्या कारला जास्त पसंती देतात. त्याचे एक कारण म्हणजे उष्णता. 

लाल, निळ्या, काळ्या रंगाची कार असेल तर ती जास्त गरम होते. यामुळे उन्हात पांढऱ्या रंगाच्या कारला जास्त पसंती दिली जाते. कारण पांढरा रंग उष्णता कमी शोषून घेतो. हे एक कारण जरी असले तरी इतरही अनेक कारणे आहेत. पांढऱ्या रंगाच्या कारला खूप मेंटेन करण्याची गरज नसते. जेवढा डार्क रंग तेवढे त्याच्यावर धूळ, स्क्रॅचेस अधिक स्पष्ट दिसतात. पांढऱ्या रंगाच्या कार या रात्रीच्या अंधारातही स्पष्टपणे दिसतात. 

नवीन कार घेताना लोक याचा विचार करतातच. रंगांमध्ये सर्वात रंगीत रंगासाठी लोकांची सर्वाधिक पसंद निळा रंग आहे. जवळपास ९ टक्के वाहने या रंगाची आहेत. तर लाल रंगाची ७ टक्के वाहने आहेत. पांढऱ्या रंगानंतर या दोन रंगांना पसंती दिली जाते. बीएएसएफच्या Color Report 2021 for Automotive OEM Coatings नुसार भारतात दहापैकी ४ लोक पांढऱ्या रंगाची कार सिलेक्ट करतात. भारतात आता ४० टक्के कार या पांढऱ्या रंगाच्या आहेत. 

दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे पांढऱ्या रंगाच्या कारला सेकंड हँड कार बाजारात जास्त मागणी आहे. तसेच या कारची रिसेल व्हॅल्यूदेखील जास्त असते. 
 

Web Title: There are many colors but... why people buy only white car in India, know reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार