तेव्हाची बातच रॉयल होती...! आता तुम्ही कधीही बुलेट घेऊ शकता, ३९ वर्षांपूर्वी काय किंमत होती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 09:22 IST2025-02-21T09:22:14+5:302025-02-21T09:22:35+5:30
आपल्या बालपणी प्रत्येक गावात एकतरी बुलेट असायची. कोणतरी धिप्पाड व्यक्ती, रुबाब झाडत ती बाईक चालवायचा.

तेव्हाची बातच रॉयल होती...! आता तुम्ही कधीही बुलेट घेऊ शकता, ३९ वर्षांपूर्वी काय किंमत होती...
बुलेटचा चाहता नसलेला व्यक्ती तुम्हाला शोधून सापडणार नाही. आजही पेट्रोलचे दर जास्त असले तरी बुलेट एकदातरी घ्यायचीच, असे मनात असलेले हजारो लोक तुम्हाला सापडतील. अनेकांकडे ५०-६० वर्षे झालेली जुनी बुलेट आहे. ही क्रेझ आजची नाही आणि उद्या संपणारही नाही. बुलेट बनविणाऱ्या रॉयल एनफील्डकडे आज अनेक प्रकारच्या बाईक आहेत. परंतू, त्यात सर्वाधिक वर्षे चालणारी म्हणजे बुलेट ३५० आहे. हीच बुलेट ४० वर्षांपूर्वी कितीला मिळत होती, तुमचा काय अंदाज ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
आपल्या बालपणी प्रत्येक गावात एकतरी बुलेट असायची. कोणतरी धिप्पाड व्यक्ती, रुबाब झाडत ती बाईक चालवायचा. ढुगू-ढुगू,ढुगू-ढुगू असा आवाज करत, काळ्या काचांचा एव्हीएटर गॉगल लावून जायचा. तुम्हालाही वाटले असेल, आपल्या वडिलांकडे देखील अशी बाईक असावी. अनेकांकडे असेलही. पण जे घेऊ शकले नाहीत, त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिलेले असेल.
तेव्हाची किंमत जर आज पाहिलात तर तुम्ही म्हणाल, खूप कमी होती. एवढ्या किंमतीचे तर आम्ही मोबाईल घेतो. पण मित्रांनो, तेव्हा ती किंमतही सामान्यांसाठी खूप होती. आजच्या काळातील ऑल न्यू क्लासिक 350 ची किंमत 2.30 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. ३९ वर्षांपूर्वी याच बुलेटची किंमत 18,700 रुपये होती.
२३ जानेवारी १९८६ चे बुलेट खरेदी केल्याचे एक बिल हाती लागले आहे. झारखंडच्या बोकारोमध्ये एका व्यक्तीने त्याच्या व्यवसायाच्या नावावर ही बुलेट घेतली होती. ही किंमत ३९ वर्षांपूर्वीची आहे. संदीप ऑटो कंपनी नावाच्या डीलरने ही बुलेट विकली होती.