मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:26 IST2025-11-05T17:26:22+5:302025-11-05T17:26:34+5:30
Maruti Suzuki 3 Crore Sale: मारुती सुझुकीने ४२ वर्षांत ३ कोटी प्रवासी वाहनांची देशांतर्गत विक्री करून इतिहास रचला. Alto, Wagon R आणि Swift सर्वाधिक विकले गेलेले मॉडेल्स ठरले.

मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
भारतातील सर्वात मोठी प्रवासी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आज एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. गेल्या ४२ वर्षांत कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत तब्बल ३ कोटी प्रवासी वाहनांची विक्री केली आहे.
हा विक्रम नोंदवणारी मारुती सुझुकी ही भारतातील पहिली आणि एकमेव कार उत्पादक कंपनी ठरली आहे. मारुतीची सुरुवात १९८३ मध्ये झाली होती. १ कोटीचा पहिला टप्पा गाठण्यासाठी कंपनीला २८ वर्षे आणि २ महिने लागले होते. पुढील दोन कोटीचा टप्पा गाठण्यासाठी कंपनीला ७ वर्षे आणि ५ महिने लागले. उरलेले १ कोटी वाहनांच्या विक्रीचा टप्पा गाठण्यासाठी कंपनीला त्याहून कमी ६ वर्षे आणि ४ महिन्यांचा कालावधी लागला. १ कोटी ते २ कोटी चा आकडा गाठण्याच्या काळात मारुतीला दुसरा ठोस पर्याय नव्हता. यामुळे हा वेग जास्त होता. परंतू, आता कंपनीला टाटा,ह्युंदाई, किया, महिंद्रा सारख्या कार कंपन्यांची मोठी टक्कर मिळत आहे. यामुळे मारुतीचा तिसऱ्या टप्प्यातील काळ कमी वाटत असला तरी तो खूपच लांबलेला आहे.
मारुतीच्या तीन कोटींच्या आकड्यात मारुती अल्टोचा मोठा वाटा आहे. मारुतीच्या अल्टोची ४७ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झालेली आहे. तर वॅगन आरची ३४ लाखांहून अधिकची विक्री झालेली आहे. स्विफ्टची ३२ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. मारुती सुझुकी सध्या देशभरात १९ मॉडेल्स आणि १७० हून अधिक व्हेरिएंट्सची विक्री करते.