Thar vs Nano Accident: असे कसे झाले! महिंद्रा थार नॅनोवर आदळली, पहा काय हालत झाली...Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 16:01 IST2023-02-19T16:01:32+5:302023-02-19T16:01:48+5:30
आता नॅनोच्या धडकेत थार कशीकाय उलटली असा प्रश्न समस्त कारप्रेमींना पडला आहे. पहा हा व्हिडीओ...

Thar vs Nano Accident: असे कसे झाले! महिंद्रा थार नॅनोवर आदळली, पहा काय हालत झाली...Video व्हायरल
टाटाच्या कार आणि त्यांची मजबुती यामध्ये सध्या त्यांचा कोणी हात धरू शकणार नाहीय असे दिवस आलेत. टाटांनी एक विदेशी कंपनी ताब्यात घेतली काय सर्व चारचाकी बिझनेसचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. टाटाच्या नॅनोला लोकांनी नाकारले तरी ज्या थारची लोकांमध्ये क्रेझ आहे त्या कारची छोट्या कारने काय हालत करून ठेवली ती पाहिली तर तुम्हाला पटेल...
सोशल मीडियावर एका रस्ते अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानुसार हा अपघात छत्तीसगढच्या दुर्ग जिल्ह्यात झाला आहे. महिंद्रा थार आणि टाटा नॅनोमध्ये अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ पाहून लोकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीय.
थार रस्त्यावर पलटी झाली आहे आणि नॅनो रस्त्यावर उभी आहे. नॅनोच्या पुढील भागाला थोडे नुकसान झाले आहे. हे पाहुन कोणीतरी आनंद महिंद्रा कुठे गायब झालेत, असा सवालही केला आहे. या अपघातानंतर लोकांमध्ये कोणती कार अधिक मजबूत याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
दुपारी 12.30 च्या सुमारास दुर्ग जिल्ह्यातील पद्ममनापूर भागातील मिनी स्टेडियमजवळ थार वेगाने येत होती. दुसऱ्या बाजूने लाल रंगाची टाटा नॅनो कार जात होती. दोन्ही वाहनांची धडक झाली, त्यात थार उलटली, असा दावा केला जात आहे. आता नॅनोच्या धडकेत थार कशीकाय उलटली असा प्रश्न समस्त कारप्रेमींना पडला आहे.
Thar vs Nano ye hua to hua kaise 🤣pic.twitter.com/Qc0zlULvhQ
— Meme Farmer (@craziestlazy) February 18, 2023