टेस्लाच्या मॉडेल ३ ने केला जागतिक विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 06:27 AM2020-09-18T06:27:38+5:302020-09-18T06:28:03+5:30

फॉर्म्युला ई रेसिंगच्या अलेक्झांडर सीम्स, डीन फिल्डिंग आणि डेव्हीड पेईलो यांनी नुकताच या गाडीतून फेरफटका मारला.

Tesla's Model 3 sets world record | टेस्लाच्या मॉडेल ३ ने केला जागतिक विक्रम

टेस्लाच्या मॉडेल ३ ने केला जागतिक विक्रम

Next

नवी दिल्ली : टेस्ला या इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनीच्या मॉडेल ३ सेडान या कारने सर्वात जलद चार्जिंगचा विक्रम केला असून, त्याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. यामुळे सन २०१५ मध्ये झालेला विक्रम मोडीत निघाला आहे.
फॉर्म्युला ई रेसिंगच्या अलेक्झांडर सीम्स, डीन फिल्डिंग आणि डेव्हीड पेईलो यांनी नुकताच या गाडीतून फेरफटका मारला.

८५५ मैलांच्या या प्रवासामध्ये या तिघांनी १ तास ३१ मिनिटे आणि ३२ सेकंद एवढाच वेळ चार्जिंगसाठी थांबण्यात घालविला. या आधी २०१५ मध्ये ३ तास ४४ मिनिटे आणि ३३ सेकंद असा सर्वात कमी वेळ नोंदविला गेला होता.

Web Title: Tesla's Model 3 sets world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन