Bajaj Auto: टेस्ला, ओला बंगळुरूला 'पळाल्या'! तरीही ही बडी कंपनी पुण्यातच ईव्ही प्रकल्प उभारणार; 300 कोटी गुंतविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 05:01 PM2021-12-29T17:01:04+5:302021-12-29T17:01:50+5:30

Bajaj Auto EV Plant: टेस्ला, ओला आणि अन्य इलेक्ट्रीक वाहने बनविणाऱ्या कंपन्यांनी बंगळुरुला पसंती दिली आहे. अन्य नव्या कंपन्या देखील बंगळुरुलाच ईव्ही हब बनवत आहेत.

Tesla, Ola 'fled' to Bangalore! However, BAJAJ Auto will set up an EV project in Pune, Akurdi | Bajaj Auto: टेस्ला, ओला बंगळुरूला 'पळाल्या'! तरीही ही बडी कंपनी पुण्यातच ईव्ही प्रकल्प उभारणार; 300 कोटी गुंतविणार

Bajaj Auto: टेस्ला, ओला बंगळुरूला 'पळाल्या'! तरीही ही बडी कंपनी पुण्यातच ईव्ही प्रकल्प उभारणार; 300 कोटी गुंतविणार

googlenewsNext

टेस्ला, ओला आणि अन्य इलेक्ट्रीक वाहने बनविणाऱ्या कंपन्यांनी बंगळुरुला पसंती दिली आहे. अन्य नव्या कंपन्या देखील बंगळुरुलाच ईव्ही हब बनवत आहेत. परंतू अशी एक कंपनी आहे, जिने पुण्यालाच पसंती दिली आहे. पुण्यात टाटा, बजाज, मर्सिडीज, फोक्सवॅगनसारख्या कंपन्या आहेत. नाशिकमध्ये महिंद्रा आहे. यामुळे सध्या तरी ऑटोमोबाईलमध्ये महाराष्ट्रच अग्रेसर आहे. यापैकीच एका कंपनीने पुण्यात ईव्ही प्लाँट निर्माण करण्याचे ठरविले आहे. 

बजाज ऑटोने पुण्याच्या आकुर्डीमध्ये आपल्या इलेक्ट्रीक व्हेईकलसाठी प्रकल्प टाकण्याचे ठरविले आहे. या प्रकल्प उभा करण्यासाठी बजाजला ३०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. यामध्ये वर्षाला ५००००० इलेक्ट्रीक वाहने उत्पादित केली जाणार आहेत. याद्वारे भारत आणि विदेशांमध्ये या गाड्या पुरविता येणार आहेत. 

या प्रकल्पात लॉजिस्टिक, मटेरिअल हँडलिंग, फॅब्रिकेशन आणि पेंटिंग, असेम्ब्ली आणि क्वालिटी अशुरन्ससह अत्याधुनिक रोबोटित आणि अॅटोमेटेड मॅनुफॅक्चरिंग सिस्टिम असणार आहेत. हा प्रकल्प पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये जूनमध्ये सुरु होण्याची शक्यता असून यामध्ये ८०० जणांना रोजगार मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले. जिथे हा प्लांट बनणार आहे तिथे चेतक स्कूटरच्या फॅक्टरीची साईट आहे. 

Web Title: Tesla, Ola 'fled' to Bangalore! However, BAJAJ Auto will set up an EV project in Pune, Akurdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.