शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Tesla ची भारतात एंट्री होऊ शकते, पण 'ही' अट आधी करावी लागेल पूर्ण! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 16:14 IST

Tesla : गेल्या महिन्यात एलन मस्क म्हणाले होते की, टेस्ला भारतात स्थानिक पातळीवर ईव्हीचे उत्पादन करणार नाही, जोपर्यंत आपल्या इलेक्ट्रिक वाहनांना भारतात विक्री आणि सर्व्हिस करण्याची परवानगी दिली जात नाही.

नवी दिल्ली : टेस्ला  (Tesla) आणि कंपनीचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांचे भारतात स्वागत आहे. मात्र, आत्मनिर्भर भारताच्या धोरणापासून सरकार कोणत्याही प्रकारे मागे हटणार नाही. भारतात आपली उत्पादने विकण्यापूर्वी कंपनीला ही अट मान्य करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, टेस्ला देशात आपली इलेक्ट्रिक वाहने विकण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याची मागणी करत आहे. गेल्या महिन्यात एलन मस्क म्हणाले होते की, टेस्ला भारतात स्थानिक पातळीवर ईव्हीचे उत्पादन करणार नाही, जोपर्यंत आपल्या इलेक्ट्रिक वाहनांना भारतात विक्री आणि सर्व्हिस करण्याची परवानगी दिली जात नाही.

भारतातील वाहनांच्या उत्पादन योजनांबद्दल विचारले असता एलन मस्क यांनी ट्विटरवर ही माहिती शेअर केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आम्हाला आधी विक्री करण्याची परवानगी नसलेल्या कोणत्याही ठिकाणी टेस्ला उत्पादन प्रकल्प उभारणार नाही". दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका शिखर परिषदेत अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री पांडे म्हणाले की, देशाचे आत्मनिर्भर धोरण कायम आहे. टेस्लाचे भारतात स्वागत आहे, पण कंपनीला देशाच्या धोरणांचे पालन करावे लागेल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्लाला भारतात इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्यासाठी निमंत्रित केले होते. कोणत्याही कर कपातीची अपेक्षा करण्यापूर्वी टेस्लाला देशासाठी त्याच्या उत्पादन योजना शेअर करण्यास सांगितले होते. नितीन गडकरी म्हणाले होते की, 'एलन मस्क भारतात टेस्ला बनवण्यास तयार असेल तर काही हरकत नाही. आमच्याकडे सर्व पात्रता आहे, विक्रेते उपलब्ध आहेत. आमच्याकडे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे आणि त्यामुळे ते खर्च कमी करू शकतात.'

दोन वर्षांपूर्वी भारतात नोंदणी झाली होतीनितीन गडकरी असेही म्हणाले होते की, टेस्लाला चीनमध्ये आपल्या ईव्हीचे उत्पादन करण्यास सांगणे आणि नंतर ते भारतात विकणे, हे कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही, कारण देशासाठी असा प्रस्ताव चांगला नाही. आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी भारतात येऊन येथे वाहनांची निर्मिती करावी करावे. दरम्यान, 2020 मध्ये टेस्लाने भारतात Tesla India Motors & Energy Pvt Ltd नावाच्या उपकंपनीद्वारे औपचारिकपणे नोंदणी केली होती.

टॅग्स :Teslaटेस्लाelon muskएलन रीव्ह मस्कAutomobileवाहनbusinessव्यवसाय