Tata Punch SUV मध्ये मिळणार महागड्या कारचे फिचर; कंपनीने टीझर केला लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 13:10 IST2021-09-12T13:08:58+5:302021-09-12T13:10:06+5:30
Tata Punch Micro SUV Teaser: मागच्या टीझरमध्ये कंपनीने टाटा पंच फाईव्ह स्टार रेटिंग देईल असा दावा केला होता. ही नवीन छोटी एसयुव्ही अल्फा मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. याच प्लॅटफॉर्मवर अल्ट्रूझ बनविण्यात आली आहे.

Tata Punch SUV मध्ये मिळणार महागड्या कारचे फिचर; कंपनीने टीझर केला लाँच
टाटा मोटर्सने खरोखरच कात टाकली आहे. एका पेक्षा एक जबरदस्त कार टाटा लाँच करत आहे. आता चर्चेत असलेल्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही Tata Punch चा एक टीझर कंपनीने लाँच केला आहे. टाटा पंचमध्ये ड्राईव्ह मोडचे फिचर असेल हे दिसत आहे. (TaTa Punch Teaser Lauch. will get Drive modes like Nexon.)
या टीझरमध्ये मायक्रो एसयुव्ही दगडधोंड्यांच्या भागात उभी असल्याचे दिसत आहे. यामध्ये लिहिले आहे की, मल्टीपल मोड्स, मल्टीपल टेरेंस. मात्र, यामध्ये स्पोर्ट ड्राईव्ह मोडबाबत माहिती दिलेली नाही. मात्र, यामध्ये नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयुव्हीसारखेच 3 ड्राईव्ह मोड असण्याची शक्यता आहे. नेक्सॉनमध्ये स्पोर्ट, सिटी आणि इको मोड देण्यात आले आहेत. इको ड्राईव्ह मोडमध्ये चांगले मायलेज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
I #PackAPunch with my capability to conquer any terrain.
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) September 9, 2021
I am Tata PUNCH#TataPUNCH#TataMotorspic.twitter.com/LGR8NO9eIh
स्पोर्ट ड्राईव्ह मोडमध्ये ड्रायव्हिंग परफ़ॉर्मन्स मिळणार आहे. कारण यामध्ये थ्रॉटल क्रियेचा पुरेपूर वापर केला जातो. सिटी ड्राईव्ह मोडमध्ये चांगले मायलेज, सोबत चांगला परफॉर्मन्सही मिळेल. Tiago आणि Tigor BS4 एडिशनदेखील या ड्राईव्ह मोडने लेस होते. टाटाने BSVI मध्ये हे मोड हटविले होते. आता पुन्हा ते परतण्याची शक्यता आहे.
मागच्या टीझरमध्ये कंपनीने टाटा पंच फाईव्ह स्टार रेटिंग देईल असा दावा केला होता. ही नवीन छोटी एसयुव्ही अल्फा मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. याच प्लॅटफॉर्मवर अल्ट्रूझ बनविण्यात आली आहे. अल्ट्रूझला ग्लोबल एनकॅपमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाली आहे.