नवीन तंत्रज्ञानासह TATA लवकरच लॉन्च करणार ३ कार; Creta आणि Seltos ला देणार टक्कर

By प्रविण मरगळे | Published: November 14, 2020 01:50 PM2020-11-14T13:50:22+5:302020-11-14T13:51:07+5:30

Tata Epiq, Tata Taureo, Tata Spyk News: ही कार मारुती सुझुकी अर्टिगासमवेत एमजी, किआ आणि ह्युंदाईच्या आगामी एमपीव्हीची स्पर्धा करेल.

Tata Motors Registers Taureo, Spyk And Epiq For Future SUV, MPV Car Launches | नवीन तंत्रज्ञानासह TATA लवकरच लॉन्च करणार ३ कार; Creta आणि Seltos ला देणार टक्कर

नवीन तंत्रज्ञानासह TATA लवकरच लॉन्च करणार ३ कार; Creta आणि Seltos ला देणार टक्कर

Next

नवी दिल्ली - टाटा मोटर्स भारतात लवकरच ३ ढासू कार लॉन्च करणार(Tata Motors Upcoming Cars) आहे. ज्यात SUV आणि MPV सेगमेंटमध्ये असणार आहे. Harrier आणि Nexon SUV ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता टाटाने kia Seltos आणि Hyundai Creta सह अन्य प्रसिद्ध कार कंपन्यांना टक्कर देणार आहे. टाटा नव्याने लॉन्च करणाऱ्या कारची किंमत ८ ते २० लाखांदरम्यान असणार आहे. ज्यात Tata Epiq, Tata Tureao आणि Tata Spyk नावाचे नवीन मॉडेल कंपनीने ट्रेडमार्क केले आहे. मात्र यात कोणता मॉडेल SUV आणि MPV आहे याबाबत स्पष्टता करण्यात आली नाही.

याचसोबत टाटा पुढील वर्षी Gravitas सारखी ७ सीटर आणि Hornabill सारखी ५ सीटर कार Blackbird च्या नावाने मिड साइड एसयूवी लॉन्च करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणती कार कोणत्या किंमतीत आहे आणि भारतात कधीपर्यंत लॉन्च होणार याबाबत ग्राहकांची उत्सुकता आहे. टाटाच्या आगामी कार मॉडेल्सपैकी एक Epic, Taureo आणि sypk इमीव्ही म्हणजे मल्टी पर्पज व्हिकल असेल. Tata Taureo एमपीव्ही असू शकते, ज्याला अल्फा प्लॅटफॉर्मवर विकसित केलं जाईल. या कारमध्ये नेक्सॉनसारखे 1.5 L पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय असू शकतात.

ही कार मारुती सुझुकी अर्टिगासमवेत एमजी, किआ आणि ह्युंदाईच्या आगामी एमपीव्हीची स्पर्धा करेल. टाटा मोटर्स येत्या काही वर्षांत मध्यम आकाराची(Mid Size) सेडानही बाजारात आणू शकेल, जी अल्फा प्लॅटफॉर्मवर विकसित केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नेक्स्ट जनरेशन Tata Nexon, Tata Tiago,आणि Tata Tigor यासारख्या मोटारीही त्याच अल्फा प्लॅटफॉर्मवर विकसित होतील. या सर्व वाहनांच्या एक्सटीरियर आणि इंटिरियरमध्ये बदल दिसून येतील. Tata Epiq आणि Tata Spyk या मॉडेलपैकी एक इलेक्ट्रिक कार असू शकते असंही सांगितलं जात आहे.

इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी कंपनी येत्या काही दिवसांत अल्ट्रोज ईव्ही, ब्लॅकबर्ड ईव्ही आणि एचबीएक्स ईव्ही सारख्या कार बाजारात आणणार आहे. टाटा पुढच्या वर्षी मे महिन्यात सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा हॉर्नबिल(Tata Hornbill) बाजारात लॉन्च करू शकेल. यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये ही ढासू कार पाहायला मिळाली होती. कंपनीने हे लोकप्रिय अल्फा मॉडेलवर डिझाइन केले आहे. या कारमध्ये 1.2 लीटर Naturally Aspirated पेट्रोल इंजिन असेल, जे 86bhp पर्यंत पॉवर जनरेट करू शकते. हे 1.2 लीटर Turbo पेट्रोल मीटरसह देखील लाँच केले जाऊ शकते.  

Web Title: Tata Motors Registers Taureo, Spyk And Epiq For Future SUV, MPV Car Launches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.