Tata Motors: भारतीय वाहन बाजारात Tata Motors ने आपल्या लोकप्रिय SUV Tata Harrier आणि Tata Safari चे पेट्रोल व्हेरिएंट अधिकृतपणे लॉन्च केले आहेत. आतापर्यंत हे दोन्ही मॉडेल्स केवळ डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध होते. पेट्रोल पर्याय आल्याने ग्राहकांसाठी निवडीचा आवाका वाढला आहे.
टाटा हॅरियर पेट्रोलची एक्स-शोरूम किंमत 12.89 लाख रुपये, तर टाटा सफारी पेट्रोलची किंमत 13.29 लाख रुपयांपासून सुरू होते.
नवे 1.5 लिटर Hyperion टर्बो पेट्रोल इंजिन
हॅरियर आणि सफारी पेट्रोलमध्ये टाटाचे नवे 1.5 लिटर Hyperion Turbo-GDi पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 170 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क निर्माण करते. ग्राहकांसाठी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध आहेत.
कंपनीच्या दाव्यानुसार, हे पेट्रोल इंजिन सेगमेंटमधील उत्तम मायलेज देते. विशेष म्हणजे, टाटा हॅरियर पेट्रोलने 12 तासांच्या ड्राइव्हमध्ये सर्वाधिक मायलेज मिळवून India Book of Records मध्ये नोंद केली आहे.
अधिक स्मूथ परफॉर्मन्स, कमी आवाज आणि कंपन
नव्या पेट्रोल इंजिनमुळे हॅरियर आणि सफारीची ड्रायव्हिंग अधिक स्मूथ झाली आहे. डिझेलच्या तुलनेत इंजिनचा आवाज कमी झाला आहे, तर कंपनदेखील लक्षणीय घटले आहे. यामुळेच दोन्ही गाड्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक आरामदायक अनुभव देतील. या दोन्ही नवीन SUVs आता पेट्रोल सेगमेंटमधील इतर स्पर्धकांना थेट टक्कर देणार आहेत.
प्रीमियम फीचर्सचा भरणा
टाटा हॅरियर आणि सफारी पेट्रोल व्हेरिएंट्समध्ये अनेक आधुनिक आणि लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामध्ये 36.9 सेमी मोठी, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, Dolby Atmos सपोर्ट असलेली प्रीमियम साउंड सिस्टिम, डिजिटल रिअर-व्ह्यू मिरर (इनबिल्ट डॅशकॅमसह), कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, व्हॉइस कमांडसह नेव्हिगेशन, स्लायडिंग फ्रंट आर्मरेस्ट मिळेल.
5-स्टार सेफ्टीचा विश्वास
सेफ्टीच्या बाबतीतही टाटाने कोणतीही तडजोड केलेली नाही. हॅरियर आणि सफारी पेट्रोलच्या सर्व व्हेरिएंट्सना Bharat NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यामध्ये लेव्हल-2 ADAS सिस्टम, एकूण 22 प्रगत सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे पेट्रोल व्हेरिएंट्सही सेफ्टीच्या बाबतीत तितकेच मजबूत ठरतात.
Web Summary : Tata Motors introduces petrol variants of Harrier and Safari SUVs. The 1.5L Hyperion turbo engine offers 170 PS power and mileage. Both manual and automatic options are available. They boast premium features and 5-star safety ratings, enhancing driving comfort.
Web Summary : टाटा मोटर्स ने हैरियर और सफारी एसयूवी के पेट्रोल वेरिएंट पेश किए। 1.5 लीटर हाइपरियन टर्बो इंजन 170 पीएस पावर और माइलेज देता है। मैनुअल और ऑटोमैटिक विकल्प उपलब्ध हैं। इनमें प्रीमियम फीचर्स और 5-स्टार सुरक्षा रेटिंग है, जिससे ड्राइविंग आरामदायक होती है।