शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टाटा मोटर्स पुढील पाच वर्षांत तब्बल डझनभर नवी वाहने आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 08:39 IST

अल्फा आणि ओमेगा असे दोन नवे प्लॅटफॉर्म बनविण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली : रतन टाटा यांचे मोठे स्वप्न असलेल्या नॅनो कारने स्वप्नभंग केल्यानंतर टाटा मोटर्स पुन्हा नव्या दमाने बाजारात उतरली आहे. टियागो, नेक्सॉनच्या यशानंतर टाटा पुढील 5 वर्षांत एक-दोन नव्हे तब्बल डझनभर पॅसेंजर कार भारतीय बाजारात आणणार आहे.   टाटा मोटर्सच्या अपयशावरून काही महिन्यांपूर्वीच रतन टाटा यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांचा नॅनो कारचा महत्वाकांक्षी प्रकल्पही बंद पडल्यात जमा आहे. गेल्या महिन्यात केवळ एक नॅनो कार सानंदच्या प्रकल्पातून बाहेर पडली. यावरून नॅनो कारचा प्रकल्प गुंडाळला जात असल्याचे दिसते. परंतू, टाटा कंपनीने जागतिक ख्यातीच्या जग्वार या कार निर्मात्या ब्रँडवर आपली मालकी मिळविल्यावर त्यांच्या कारमध्ये मोठे बदल झाले आहेत. नव्या प्लॅटफॉर्मवर बनविलेली टियागो ही हॅचबॅक आणि सब-4 मिटर सेडान टिगॉर या कारनी भारतीय बाजारात सनसनी आणली असताना कंपनीने नेक्सॉन ही मिनी एसयुव्ही प्रकारातील कार बाजारात आणत मारुतीच्या ब्रिझा आणि फोर्डच्या इकोस्पोर्टला चांगलीच टक्कर दिली आहे.  आता टाटा मोटर्स पुढील पाच वर्षांत सध्याच्या सेगमेंटमध्ये कायम राहण्याबरोबरच नवी 10 ते 12 वाहने बाजारात आणणार आहे. यासाठी दोन नवे प्लॅटफॉर्म बनविण्यात येणार असून ते अल्फा आणि ओमेगा असे असणार आहेत. याद्वारे कंपनी भारतीय प्रवासी वाहनांच्या बाजारात 90 टक्के अस्तित्व राहील, असे प्रवासी वाहन विभागाचे टाटा मोटर्सचे अध्यक्ष मयांक पारीख यांनी सांगितले. तसेच जुने प्लॅटफॉर्म बंद करण्यात येणार असून यापुढे 2 प्लॅटफॉर्म असणार आहेत.  पुढील वर्षी हॅरिअर ही एसयुव्ही लाँच होणार आहे. अल्फा प्लॅटफॉर्मवर 4.3 मिटर लांबीच्या हॅचबॅक आणि त्यापेक्षा मोठ्या एसयुव्ही प्रकारातील गाड्यांसाठी ओमेगा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार आहे. 

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगTataटाटाbusinessव्यवसाय