शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

टाटा मोटर्सचा धमाका! स्मॉल कमर्शियल वाहने, 'पिकअप्स'च्या खरेदीवर मिळणार खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 14:46 IST

२२ सप्टेंबरपर्यंत करावे लागणार बुकिंग... आठ दिवसांत मिळणार वाहनाची डिलिव्हरी

टाटा मोटर्स ही भारतातील पहिल्या क्रमांकाची कमर्शियल वाहन निर्माती करणारी कंपनी आहे. आपल्या छोटेखानी कमर्शियल वाहनांच्या आणि पिक-अप (SCVPU)च्या ग्राहकांसाठी टाटा मोटर्सकडून एका खास ऑफर देण्यात येत आहे. दिवाळीला अजून वेळ असला तरीही, टाटा मोटर्सने उत्सवाआधीच हा खास सण साजरा करण्यास सुरुवात केली आहे. जीएसटीचा संपूर्ण लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीने आता आणखी एक आकर्षक ऑफर दिली आहे. या विशेष योजनेअंतर्गत ग्राहकांन हमखास भेटवस्तूच्या स्वरूपात ३२-इंची एलईडी टीव्ही मिळणार आहेच. त्याचसोबत डिझेल, पेट्रोल आणि बाय-फ्युएल व्हेरिएंट्सवरील टाटाचे लोकप्रिय ब्रँड्स Ace, Ace Pro, Intra आणि Yodha या वाहनांच्या खरेदीवर तब्बल ६५ हजारापर्यंतच्या अतिरिक्त भेटवस्तू मिळणार आहेत.

ही मर्यादित कालावधीची ऑफर २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत केलेल्या बुकिंगसाठी लागू असणार आहे. याअंतर्गत बूक झालेल्या वाहनांचे वितरण ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी पूर्ण केले जाणार आहे. याशिवाय, बाजारात आलेले Ace Pro व्हेरिएंट आता फक्त ३.६७ लाखांच्या किंमतीपासून सुरू होत आहे. त्यामुळे उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी आणखी सोपा आणि तुलनेने कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या वाहनाच्या व्‍हेरिएण्‍टच्या अचूक किमतीची माहिती अधिकृत टाटा मोटर्स शोरूममधूनच मिळेल.

  • एस प्रो - ३.६७ लाखांपासून सुरू
  • एस - ४.४२ लाखांपासून सुरू
  • इन्ट्रा - ७.४१ लाखांपासून सुरू
  • योद्धा - ९.१६ लाखांपासून सुरू
टॅग्स :Tataटाटा