टाटा मोटर्सचा धमाका! स्मॉल कमर्शियल वाहने, 'पिकअप्स'च्या खरेदीवर मिळणार खास गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 14:46 IST2025-09-14T14:45:30+5:302025-09-14T14:46:12+5:30
२२ सप्टेंबरपर्यंत करावे लागणार बुकिंग... आठ दिवसांत मिळणार वाहनाची डिलिव्हरी

टाटा मोटर्सचा धमाका! स्मॉल कमर्शियल वाहने, 'पिकअप्स'च्या खरेदीवर मिळणार खास गिफ्ट
टाटा मोटर्स ही भारतातील पहिल्या क्रमांकाची कमर्शियल वाहन निर्माती करणारी कंपनी आहे. आपल्या छोटेखानी कमर्शियल वाहनांच्या आणि पिक-अप (SCVPU)च्या ग्राहकांसाठी टाटा मोटर्सकडून एका खास ऑफर देण्यात येत आहे. दिवाळीला अजून वेळ असला तरीही, टाटा मोटर्सने उत्सवाआधीच हा खास सण साजरा करण्यास सुरुवात केली आहे. जीएसटीचा संपूर्ण लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीने आता आणखी एक आकर्षक ऑफर दिली आहे. या विशेष योजनेअंतर्गत ग्राहकांन हमखास भेटवस्तूच्या स्वरूपात ३२-इंची एलईडी टीव्ही मिळणार आहेच. त्याचसोबत डिझेल, पेट्रोल आणि बाय-फ्युएल व्हेरिएंट्सवरील टाटाचे लोकप्रिय ब्रँड्स Ace, Ace Pro, Intra आणि Yodha या वाहनांच्या खरेदीवर तब्बल ६५ हजारापर्यंतच्या अतिरिक्त भेटवस्तू मिळणार आहेत.
ही मर्यादित कालावधीची ऑफर २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत केलेल्या बुकिंगसाठी लागू असणार आहे. याअंतर्गत बूक झालेल्या वाहनांचे वितरण ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी पूर्ण केले जाणार आहे. याशिवाय, बाजारात आलेले Ace Pro व्हेरिएंट आता फक्त ३.६७ लाखांच्या किंमतीपासून सुरू होत आहे. त्यामुळे उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी आणखी सोपा आणि तुलनेने कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या वाहनाच्या व्हेरिएण्टच्या अचूक किमतीची माहिती अधिकृत टाटा मोटर्स शोरूममधूनच मिळेल.
- एस प्रो - ३.६७ लाखांपासून सुरू
- एस - ४.४२ लाखांपासून सुरू
- इन्ट्रा - ७.४१ लाखांपासून सुरू
- योद्धा - ९.१६ लाखांपासून सुरू