Tata Harrier appear in a new look? The sunroof comes with special features | Tata Harrier दिसणार नव्या अवतारात? सनरुफसोबत मिळणार खास फीचर्स
Tata Harrier दिसणार नव्या अवतारात? सनरुफसोबत मिळणार खास फीचर्स

नवी दिल्ली: भारतातील नामांकित कंपनी टाटा मोटर्सने गेल्या जानेवारी महिन्यात कॉम्पॅक्ट एसयूव्ही Tata Harrier कार लाँच केली होती. आता या एसयूव्ही Tata Harrier कारमध्ये फीचर्स, ट्रांन्समिशन आणि इंजिन अपग्रेडेशन करण्याचे काम कंपनीकडून करण्यात येत आहे. याबाबतचे कारच्या अपडेटेड मॉडलला टेस्टिंग करतानाचे फोटो सध्या दिसून येत आहेत. यामध्ये एसयूव्ही Tata Harrier कारला सनरुफ देण्यात आल्याचे दिसत आहे. 

(फोटो क्रेडिट: autocarindia)

याशिवाय बाकीचे डिझाईन सध्याचे स्पेक हॅरियर सारखे आहे. मात्र, कॅलिस्टो कॉपरमध्ये तयार करण्यात आलेल्या स्पेशल मॉडलमध्ये फॅक्टरी-फिटेड सनरुफ आहे. याचबरोबर, एसयूव्ही Tata Harrier कारच्या अपडेटेड कारचे इंजिन व पॉवरचा विचार केल्यास 2 लिटरचे 4 सिलेंडर टर्बोचार्ज्ड इंजिन दिले जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या आउटपुट 138 पीएसच्या तुलनेत 170 पीएसची पॉवर जनरेट होईल. मात्र, टॉर्क आउटपुट 350 न्यूटन मीटर आधीसारखेच असेल.  

कारमधील फिचर्सच्या बाबतीत विचार केल्यास सध्याच्या Harrier मध्ये देण्यात आलेले पॅावर स्टियरिंग, टिल्ट आणि टेलिस्कोपिक एडजस्टेबल स्टीयरिंग, पॅावर विंडो, 8.8 इंच टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम, हाई- रेश्योल्यूशन डिस्प्ले, 9 JBL स्पीकर्स, एम्प्लीफायर, फुल डिजिटल 7 इंच TFT इंस्टूमेंट क्लस्टर यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत. हे फिचर्स एसयूव्ही  Eco, City आणि Sport यासारख्या तीन वेगवेगळ्या ड्राइव्हिंग मोड्समध्ये येतात.

Web Title: Tata Harrier appear in a new look? The sunroof comes with special features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.