भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशन म्हणून टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सने मोठी घोषणा केली आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला लवकरच लॉन्च होणारी नवी Tata Sierra भेट म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा कंपनीने केली आहे. खरे तर, ही केवळ एक भेट नाही, तर देशाला गौरव मिळवून देणाऱ्या या खेळाडूंच्या धैर्य, समर्पण आणि जिद्दीचा सन्मान असेल.
२ नोव्हेंबर रोजी झालेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी मात करून पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेला हा विजय भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर अप्रतिम कामगिरी करत देशाची मान अभिमानाने उंचावली.
यासंदर्भात, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्र म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेट संघाने असामान्य प्रदर्शन करत जबरदस्त विजय मिळवून संपूर्ण देशाला अभिमानाची अनुभूती करवून दिली. त्यांचा प्रवास म्हणजे, दृढ निश्चय आणि विश्वासाचे प्रतीक आहे. जे प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. टाटा मोटर्ससाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, आम्ही या लिजन्ड्सना एक आणखी लिजन्ड Tata Sierra भेट कर आहोत."
कंपनीने स्पष्ट केले की, प्रत्येक खेळाडूला या SUV चे टॉप मॉडेल देण्यात येईल. Tata Sierra २५ नोव्हेंबर २०२५ रोजी लॉन्च होणार असून, पहिल्या बॅचमधील कार भारतीय महिला क्रिकेट संघाला दिल्या जाणार आहेत.
तीन पर्यायांमध्ये असेल ही SUV -Tata Sierra 1990 च्या दशकात ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली होती. आता ती आधुनिक डिझाइन आणि मल्टी-पावरट्रेन तंत्रज्ञानासह नव्या रुपात येत आहे. ही नवीन सिएरा विविध इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल. यात 1.5-लिटर नॅच्युरली-एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल (TGDi) आणि 2.0-लिटर क्रायोटेक डिझेल इंजनचा समावेश आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक व्हर्जन (EV) देखील येणार असून, त्यात 65kWh आणि 75kWh बॅटरी पॅक असतील. पेट्रोल आणि डिझेल व्हर्जन लवकरच लॉन्च होणार आहे. तर इलेक्ट्रिक व्हर्जन जानेवारी 2025 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
असे असेल इंजिन - या कारसोबत देण्यात येणारे, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजन 170 बीएचपी पॉवर आणि 280 एनएम टॉर्क देईल, तर डिझेल इंजिन 170 बीएचपी आणि 350 एनएम टॉर्क प्रदान करेल. दोन्ही इंजिन्सना 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय मिळेल. इलेक्ट्रिक व्हर्जनची रेंज 500 किमीपेक्षा जास्त असेल, आणि 75kWh बॅटरीसह AWD पर्याय उपलब्ध असेल.
डिझाइन आणि वैशिष्ट्ये -नवीन Sierra चे डिझाइन साधारणपणे, जुन्या क्लासिक लूक प्रमाणेच आहे. मात्र ते आधुनिक आणि फ्युचरिस्टिक आहे. यात LED DRLs, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, पॅनोरमिक सनरूफ, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, ADAS, प्रीमियम इंटीरियर आणि प्रशस्त सीटिंग यासारखी वैशिष्ट्ये असतील.
Web Summary : Tata Motors will gift each member of the victorious Indian women's cricket team a Tata Sierra SUV to celebrate their World Cup win. The SUV, launching in 2025, will be a token of appreciation for their dedication and achievement.
Web Summary : टाटा मोटर्स विश्व कप जीतने वाली भारतीय महिला क्रिकेट टीम के प्रत्येक सदस्य को सिएरा एसयूवी उपहार में देगा। 2025 में लॉन्च होने वाली यह एसयूवी उनके समर्पण और उपलब्धि के लिए एक सम्मान होगा।