टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 20:38 IST2025-09-05T20:38:18+5:302025-09-05T20:38:35+5:30

Tata Cars Gst Cut new Rates: टाटा मोटर्सने त्यांच्या सर्वात स्वस्त कार टाटा टियागोपासून प्रसिद्ध एसयूव्ही टाटा सफारीपर्यंत सर्व वाहनांच्या किमतीत बदल केले आहेत. ही कपात २२ सप्टेंबरपासून सर्व डीलरशीपवर लागू होणार आहे.

Tata Cars Gst Cut new Rates: Tiago gets Rs 75,000 discount, Nexon, Harrier, Safari get much cheaper; Tata announces GST cut prices | टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले

टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले

जीएसटी कपातीमुळे २२ सप्टेंबरपासून सर्वच वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. याप्रमाणे वाहनांचे दरही कमी होणार आहेत. ते किती होतील त्याची वजाबाकी कंपन्या करत असताना टाटाने आपल्या ताफ्यातील कारच्या किंमती कितीने कमी होणार हे जाहीर करून टाकले आहे. 

टाटा मोटर्सने त्यांच्या सर्वात स्वस्त कार टाटा टियागोपासून प्रसिद्ध एसयूव्ही टाटा सफारीपर्यंत सर्व वाहनांच्या किमतीत बदल केले आहेत. ही कपात २२ सप्टेंबरपासून सर्व डीलरशीपवर लागू होणार आहे. आता या किंमती राज्या राज्यांप्रमाणे वेगवेगळ्या असणार आहेत. 

टाटाच्या वाहनांवर किती जीएसटी कमी झाला...
टियागो 75,000
टिगोर 80,000
Altroz ​​1,10,000
पंच 85,000
Nexon 1,55,000
कर्व्ह 65,000
हॅरियर 1,40,000
सफारी 1,45,000

टाटाची सर्वात स्वस्त टियागो आता जवळपास ७५००० रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. तर सर्वाधिक कर कपात ही टाटा नेक्सॉनवर झाली आहे. एवढेच नाहीतर टाटा अल्ट्रॉझ 1,10,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. टाटाच्या एसयुव्ही हॅरिअर, सफारीवरील जीएसटी हा १.४० लाखांहून अधिक कमी झाला आहे. 

Web Title: Tata Cars Gst Cut new Rates: Tiago gets Rs 75,000 discount, Nexon, Harrier, Safari get much cheaper; Tata announces GST cut prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.