शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कार विकण्यापूर्वी 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 13:14 IST

आता जर तुम्ही तुमची कार विकली आणि FASTag बंद केला नाही, तर नवीन खरेदीदार तुमच्या FASTag चे सर्व फायदे घेऊ शकतात.

FASTag Rule  : जर तुम्ही तुमची कार विकण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. कार विकण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष दिले नाही, तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. दरम्यान, एक काळ असा होता की, टोल नाक्यावर टोलमुळे लांबच लांब रांगा लागत होत्या. यामुळे वेळेचा अपव्यय होत होता.

ही समस्या सोडवण्यासाठी FASTag सुरू करण्यात आले. FASTag वापरण्याचा काळ सुरू झाला. त्यानंतर लोकांना टोल नाक्यावर लांबच लांब रांगांपासून सुटका मिळाली आणि टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी देखील कमी होऊ लागली आहे. लोकांच्या वाहनावर FASTag चे स्टिकर विशिष्ट ठिकाणी चिकटवले जाते, त्यातून टोलचे पैसे आपोआप कापले जातात. यामुळे लोकांचा प्रवासातील बराच वेळ वाचू लागला आहे.

दरम्यान, FASTag ही एक डिजिटल पेमेंट सुविधा आहे, ज्याच्या मदतीने टोल नाक्यावर टोल पेमेंट केले जाते. जर तुम्ही तुमची कार विकली असेल आणि FASTag निष्क्रिय (डिअॅक्टिव्हेट) केले नाही तर तुम्हाला खूप नुकसान होऊ शकतो. त्यामुळे कार विक्री करण्यापूर्वी FASTag निष्क्रिय करणे अत्यंत आवश्यक आहे. FASTag अधिकृत जारीकर्त्यांकडून किंवा सहभागी बँकांकडून खरेदी केला जाऊ शकतो. हे तुमच्या बँकेला लिंक केलेले असते. 

आता जर तुम्ही तुमची कार विकली आणि FASTag बंद केला नाही, तर नवीन खरेदीदार तुमच्या FASTag चे सर्व फायदे घेऊ शकतात. अशा परिस्थितीत, कार विकण्यापूर्वी FASTag खाते बंद करणे आवश्यक आहे. याशिवाय, जर तुम्ही तुमचा FASTag बंद केला नाही, तर तुमच्या कारचा नवीन खरेदीदार सहजपणे तुमच्या FASTag चा फायदा घेऊ शकतो. दरम्यान, नवीन खरेदीदार तुमच्या FASTag सह पैसे देऊ शकतो, जे तुमच्या खात्यातून कापले जातील. पण, जोपर्यंत तुम्ही तुमचे FASTag खाते बंद करत नाही, तोपर्यंत तुमच्या कारचा नवीन मालक नवीन FASTag साठी अर्ज करू शकत नाही.

असे करू शकता FASTag अकाउंट बंद! - भारत सरकारच्या हेल्पलाइन क्रमांक 1033 वर कॉल करून तुम्ही FASTag संबंधित सर्व तक्रारींचे निराकरण करू शकता.- तुम्ही तुमच्या सेवा प्रदात्याच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करून FASTag बंद करू शकता.- NHAI (IHMCL) - 1033 वर कॉल करा. येथे तुम्हाला FASTag बंद करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितले जाईल.- ICICI Bank - 18002100104 वर कॉल करा. येथे तुम्हाला FASTag बंद करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितले जाईल.- PayTm – 18001204210 वर कॉल करून तुम्ही तुमचे FASTag अकाउंट बंद करू शकता.- Axis Bank – 18004198585 वर कॉल करून तुम्ही FASTag अकाउंट बंद करून घेऊ शकता.- HDFC Bank - 18001201243 वर कॉल करा. येथे तुम्हाला FASTag अकाउंट बंद करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितले जाईल.- Airtel Payments Bank –  FASTag अकाउंट बंद करण्यासाठी 8800688006 क्रमांकावर कॉल करा. येथे तुम्हाला FASTag बंद करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली जाईल.

टॅग्स :Fastagफास्टॅगcarकारAutomobileवाहन