शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
2
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
4
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
5
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
6
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
7
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
8
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
9
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
10
प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी, अश्लिल व्हिडिओ प्रकरणी जर्मनीहून परतल्यावर SIT ने केली होती अटक
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

तरुणांना वेड लावेल 'ही' इलेक्ट्रिक बाईक; 40 हजार रुपयांची मिळेल सबसिडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 12:03 PM

Svitch CSR 762 Electric Motorcycle : कंपनी 2022 मध्ये CSR 762 प्रकल्पावर 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. CSR 762 ची डिझाइन एशियाटिक लायन्स म्हणजेच सिंहापासून प्रेरित आहे.

नवी दिल्ली : भारतात दिवसेंदिवस नवीन स्टार्टअप्स एकापेक्षा एक उत्तम इलेक्ट्रिक वाहने घेऊन येत आहेत. विशेषत: इलेक्ट्रिक टू-व्हिलर तयार करण्यात कंपन्यांचा जोर दिसून येत आहे. अशाच एका नवीन स्टार्ट स्विच मोटोकॉर्पने CSR 762 नावाची नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च केली आहे. या ई-बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.65 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, यावर ग्राहकांना 40,000 रुपयांची सबसिडी मिळणार आहे. कंपनी 2022 मध्ये CSR 762 प्रकल्पावर 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. CSR 762 ची डिझाइन एशियाटिक लायन्स म्हणजेच सिंहापासून प्रेरित आहे.

स्विच CSR 762 सोबत 3.7 kW-hr लिथियम-आयन बॅटरी पॅक जोडण्यात आले आहे, जे 10 kW पॉवर आणि 56 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही बॅटरी स्वॅपही करता येते. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल कम्बाइंड चार्जिंग सिस्टीम म्हणजेच सीसीएस बॅटरी चार्जरच्या मदतीने देखील चार्ज करता येते. सिंगल चार्जमध्ये, ही इलेक्ट्रिक बाइक 110 किमी पर्यंत चालवता येते आणि तिचा टॉप स्पीड 120 किमी / तास आहे.

3 राइडिंग मोड्सCSR 762 सोबत कंपनीने स्पोर्ट, रिव्हर्स आणि पार्किंग असे 3 राइडिंग मोड्स दिले आहेत आणि हे मोड्स सर्वसाधारणपणे ई-बाईकसह उपलब्ध करून दिले आहेत. या मोटरसायकलला सेंट्रल ड्राईव्ह सिस्टीमसह शक्तिशाली 3 किलोवॅट क्षमतेची पर्मनेंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर देण्यात आली आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक मोटरसायकलसह 5-इंचाचा टीएफटी कलर डिस्प्ले आणि ओव्हरहिटिंग टाळण्यासाठी थर्मोसिफोन कुलिंग सिस्टम देखील देण्यात आले आहे. 

टॅग्स :AutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कार