Suzuki Swift In Pakistan : पाकिस्तानात लाँच होणार भारतातील 'ही' सुप्रसिद्ध कार; पण किंमत पाचपट अधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 17:00 IST2022-01-21T17:00:33+5:302022-01-21T17:00:58+5:30
भारतातील सर्वात लोकप्रिय कार आता पाकिस्तानमध्ये लाँच होणार आहे. पाहा कोणती आहे ही कार आणि का आहे पाकिस्तानातही याचं क्रेझ.

Suzuki Swift In Pakistan : पाकिस्तानात लाँच होणार भारतातील 'ही' सुप्रसिद्ध कार; पण किंमत पाचपट अधिक
भारतातील सर्वात लोकप्रिय कार आता पाकिस्तानमध्ये लाँच होणार आहे. सध्या पाकिस्तानात सुझुकी ही कंपनी स्विफ्टचं (Suzuki Swift) जुनं मॉडेल विकत आहे. परंतु आता सुझुकी तिथे स्विफ्ट लाँच करणार आहे. स्विफ्टचं जुनं मॉडेल पाकिस्तानात 10 वर्षांपासून विकले जात होते. परंतु आता कंपनीनं ते बंद केलं आहे. परंतु आता जुनी स्विफ्ट बंद केल्यानंतर, सुझुकी पुढील महिन्यात (फेब्रुवारी 2022) आपली न्यू जनरेशन लॉन्च करू शकते. रिपोर्टनुसार, पाकिस्तान सुझुकी मोटर कंपनी (PSMC) फेब्रुवारी 2022 मध्ये पाकिस्तानमध्ये सुझुकी स्विफ्टची नवं व्हेरिअंट लाँच करण्याच्या तयारीत आहे.
पाकिस्तानमधील नवीन सुझुकी स्विफ्ट 5-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ट्रान्समिशनसह 1250cc इंजिनसह लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय 1000cc टर्बो इंजिनसह आणखी एक व्हेरिअंट यानंतरही लाँच होऊ शकेल. परंतु सध्या, पाकिस्तानमध्ये 1250cc इंजिन व्हेरिअंट मिळण्याची शक्यता.
किती असेल किंमत?
Suzuki Swift पाकिस्तानमध्ये 27 लाख रुपये (PKR) मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. या कारची किंमत जुन्या स्विफ्टपेक्षा खुप जास्त आहे. पाकिस्तानमधील जुनी सुझुकी स्विफ्ट बंद केल्यानंतर कंपनीनं अलिकडच्या काही महिन्यांत त्याच्या किमती वाढवल्या आहेत.
Eeco ची या नावाने होते विक्री
भारतात विक्री होणारी मारुती सुझुकी इको ही पाकिस्तानमध्ये सुझुकी बोलन (Suzuki Bolan) या नावाने विकली जाते. बोलनचं डिझाईन हे भारतात विक्री होणाऱ्या Eeco पेक्षा थोडं निराळं आहे. मल्टी पर्पज युझ, कमी किंमत, सीटिंग कॅपॅसिटी आणि चांगली रिसेल व्हॅल्यू यासाठी ही कार पाकिस्तानात अधिक लोकप्रिय आहे. पाकिस्तानात बोलनची किंमत जवळपास 11 लाख रुपये (PKR) पासून सुरू होते. भारतात या कारची एक्स शोरुम किंमत 438000 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे.