मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:42 IST2025-11-01T15:41:17+5:302025-11-01T15:42:04+5:30
ASEAN बाजारासाठी डिझाइन केलेल्या या मॉडेलने ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे.

मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
मारुती सुझुकी Fronx भारतात लॉन्च झाल्यापासूनच सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्ट SUV पैकी एक आहे. या कारला आता ५ स्टार सेफ्टी रेटिंगही मिळाले आहे. ASEAN बाजारासाठी डिझाइन केलेल्या या मॉडेलने ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे. इंडोनेशियातील सिकांग प्लांटमध्ये तयार करण्यात आलेली ही फ्रॉन्क्स इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, मलेशिया, फिलिपाईन्स, थायलंड आणि व्हिएतनामसाठी तयार करण्यात आली आहे.
2025 सुझुकी फ्रॉन्क्सचा क्रॅश टेस्ट स्कोर जबरदस्त राहिला. ASEAN NCAP द्वारे टेस्ट करण्यात आलेल्या व्हेरिअंट MY25 व्हर्जनचे होते. ज्याचा कर्ब मास 1060 kg होता. 6 एअरबॅग्ज स्टँडर्ड स्वरुपात देण्यात आले होते. याला 1.5L NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरसह येते.
ASEAN मार्केटसाठी या कारमध्ये भारतातील मॉडेलपेक्षा काही अतिरिक्त फिचर्स देण्यात आले आहेत. यात ADAS प्रणाली आणि फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्सचा समावेश आहे. ADAS ऑप्शनल स्वरूपात असून त्यात ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग आणि लेन कीप ऑटोनॉमस वैशिष्ट्ये आहेत.
सेफ्टी चाचणीत फ्रॉन्क्सला अडल्ट ऑक्यूपेंट सेफ्टी टेस्टमध्ये एकूण 29.37 पॉइंट्स मिळाले आहेत. (फ्रंटल इम्पॅक्टसाठी 13.74 पॉइंट्स, साइड इम्पॅक्टसाठी 7.63 पॉइंट्स आणि हेड प्रोटेक्शन टेकसाठी 8 पॉइंट्स.) बाल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 38.94 गुण मिळाले आहेत. (डायनामिक टेस्टमध्ये 17.94 पॉइंट्स, व्हेइकल बेस्ड टेस्टसाठी 9 पॉइंट्स, इंस्टॉलेशनसाठी 12 पॉइंट्स आणि चाइल्ड डिटेक्शनसाठी 0 पॉइंट्स).
याशिवाय, सेफ्टी असिस्ट श्रेणीत फ्रॉन्क्सने 16.5 गुण आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी 8 गुण मिळाले आहेत. ASEAN NCAP नुसार या गाडीने एकूण 77.70 गुणांसह 5-स्टार रेटिंग मिळवली आहे.
महत्वाचे म्हणजे, ही टेस्ट इंडोनेशियामध्ये तयार झालेल्या ASEAN-स्पेसिफिक फ्रॉन्क्सवर करण्यात आली असून इंडिया-स्पेसिफिक मारुती सुझुकी फ्रॉन्क्सचे क्रॅश टेस्ट, भारत NCAP आणि ग्लोबल NCAP द्वारे केले जाणे बाकी आहे. मात्र इंटरनल क्रॅश टेस्टिंग रिझल्ट्स चांगले असल्याचा दावा कंरनी करते.