Surprise ... Tata's Indica car runs at 5.85 lakh km without engine work | आश्चर्य...टाटाची इंडिका कार तब्बल 5.85 लाख किमी चालली
आश्चर्य...टाटाची इंडिका कार तब्बल 5.85 लाख किमी चालली

टाटाने मालवाहतूक करणाऱ्या गाड्याच बनवाव्यात, असे अनेकदा म्हटले जाते. मात्र, टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत कात टाकली असून चांगल्या कार ग्राहकांच्या सेवेत आणल्या आहेत. मात्र, टाटाच्या इंडिकाने कमालच केली आहे. दहा वर्षे जुनी या कारने तब्बल 5.85 लाख किमींचे अंतर एकदाही इंजिनाचे काम न करता कापले आहे. केरळमधील ही कार असून टाटाच्या सर्व्हिस सेंटरकडून मालकाचा सत्कारही करण्यात आला आहे. 


महत्वाचे म्हणजे टाटा इंडिका ही कार भारतातील पहिली पॅसेंजर कार होती. यामुळे लाँच झाल्यापासून ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरली होती. मोठी केबिन आणि डिझेल इंजिनमुळे ही परवडणारी कार रस्त्यावर धावू लागली होती. आता या कारने आणखी एक विक्रम केला आहे. केरळच्या हायसन चलाक्कुडी टाटा या डिलरने मालकाचा सत्कार केला आहे. 


Tata Indica DLS हे मॉडेल 14 ऑगस्ट 2009 मध्ये नोंद करण्यात आले होते. या कारने वर्षाला 60 हजार किमींचे रनिंग केलेले आहे जे काहीसे जास्तच आहे. या कारच्या मालकाचे नाव वरदराजन असे आहे. वरदराजन यांनी या कारची योग्य काळजी घेतल्याने हा पल्ला गाठता आला आहे. जर डिझेल इंजिनचे ऑईल, फिल्टर आणि गिअर बदलण्याची पद्धत योग्य आणि वेळच्यावेळी केल्यास ही इंजिने जास्त काळ चालतात. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या इंजिनांचे आयुष्य जास्त असते. स्कॉर्पिओने पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 


या कारबाबत अधिक माहिती मिळालेली नसली तरीही महिन्याला एवढे किमी चालविली गेली आहे, म्हणजे ती एकतर प्रवासी वाहतुकीसाठी असावी किंवा व्यवसायासाठी. अन्यथा एका महिन्यात 60 हजार किमी चार चालविणे तसे परवडणारे आणि शक्यही नाही. अशा काही कार आहेत ज्यांनी 8 ते दहा लाखांपर्यंत रनिंग केलेली आहे. 
 

Web Title: Surprise ... Tata's Indica car runs at 5.85 lakh km without engine work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.