शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ड्राईव्ह करतानाही चार्ज करता येणार ही सोलार कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 12:27 IST

12.76 लाख रुपये किंमतीत मिळणार प्रिमियम कारसारखी वैशिष्ट्ये

बर्लिन : जर्मनीमध्ये 2020 पर्यंत 10 लाख विजेवर चालणारी वाहने रस्त्यावर आणण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर म्युनिचच्या एका स्टार्टअप कंपनीने एक पाऊल पुढे टाकत सौर उर्जेवर बॅटरी चार्ज करणारी कार बनविली आहे. महत्वाचे म्हणजे ही कार चालवत असतानाही बॅटरी चार्ज होणार आहे. सोनो मोटर्स असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीने नुकतीच दक्षिण जर्मनीच्या तप्त उन्हामध्ये या कारची यशस्वी चाचणी घेतली. या कारचे नाव सायन असे ठेवण्यात आले आहे. जर्मनीच्या सरकारने ठेवलेले लक्ष्य पूर्ण होणे सध्यातरी अशक्यच वाटत आहे. यामुळे सरकारने अशा कंपन्यांना प्रोत्साहन देताना विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी जी कंपनी बॅटरी साठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करेल तिला सरकारकडून मदत मिळण्याचे आश्वासन दिले आहे. सोनो मोटर्स ही कंपनी 2016 मध्ये स्थापन करण्यात आली. ही कंपनी पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारी कार बनवत आहे. या कारवर सौर पॅनल बसविण्यात आले आहे. ही कार सौर उर्जेसोबतच विजेवर किंवा दुसऱ्या विजेवर चालणाऱ्या कारद्वारे चार्ज होऊ शकणार आहे. या कारची निर्मिती 2019च्या मध्यावर सुरु करण्य़ात येणार आहे. जर्मनीच्या प्रकल्पाला आजपर्यंत 5 हजार ऑर्डर मिळाल्या आहेत. या कारची किंमत 12.76 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र, या कारमधील वैशिष्ट्ये एखाद्या प्रिमियम कारसारखी असणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगElectric Carइलेक्ट्रिक कारcarकार