नवीन 'कुशाक फेसलिफ्ट' भारतात लाँच; किंमत ₹१०.६९ लाखांपासून सुरू, पाहा काय आहेत फीचर्स
भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी स्कोडा ऑटो इंडियाने अखेर बहुप्रतिक्षित २०२६ स्कोडा कुशाक फेसलिफ्ट अधिकृतपणे लाँच केली आहे. या नवीन मॉडेलमध्ये कंपनीने डिझाइन आणि फीचर्समध्ये अनेक मोठे बदल केले असून याची सुरुवातीची किंमत १०.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
आकर्षक लूकनवीन कुशाकच्या समोरच्या भागात स्कोडाची सिग्नेचर ग्रिल, नवीन एलईडी हेडलॅम्प्स आणि रिडिझाइन केलेले बंपर देण्यात आले आहेत, ज्यामुळे ती अधिक स्पोर्टी दिसते. कारच्या आत १०-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांसारख्या आधुनिक सोयी देण्यात आल्या आहेत. यामध्ये ६ एअरबॅग्स (मानक म्हणून), ३६०-डिग्री कॅमेरा आणि प्रगत ADAS फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्सस्कोडा कुशाक फेसलिफ्टमध्ये पूर्वीप्रमाणेच दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. १.०-लिटर TSI पेट्रोल जे ११५ PS पॉवर जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल किंवा ८-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह उपलब्ध आहे.
दुसरे १.५-लिटर TSI पेट्रोल
जे १५० PS पॉवर जनरेट करते आणि परफॉर्मन्ससाठी ओळखले जाते. दोन्ही इंजिनसोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये प्रगत ७-स्पीड DSG गियरबॉक्स देण्यात आला आहे. इंधनाची बचत करण्यासाठी यामध्ये 'ॲक्टिव्ह सिलेंडर टेक्नॉलॉजी' देण्यात आली आहे.
किमतीचा तपशील (एक्स-शोरूम)सुरुवातीची किंमत: नवीन कुशाक फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत १०.६९ लाख रुपये आहे.
१.० लीटर टर्बो पेट्रोल (टॉप मॉडेल): या इंजिन व्हेरिएंटच्या टॉप मॉडेलची किंमत १६.७९ लाख रुपये इतकी आहे.
ऑटोमॅटिक व्हेरिएंट्स: कुशाकच्या ऑटोमॅटिक मॉडेल्सची किंमत १२.६९ लाख रुपये पासून सुरू होते.
Web Summary : Skoda Auto India launched the 2026 Kushaq facelift, starting at ₹10.69 lakh. It features updated design, 10-inch touchscreen, ventilated seats, and ADAS. Engine options include 1.0L and 1.5L TSI petrol, with manual and automatic transmissions.
Web Summary : स्कोडा ऑटो इंडिया ने 2026 कुशाक फेसलिफ्ट को ₹10.69 लाख की शुरुआती कीमत पर लॉन्च किया। इसमें अपडेटेड डिज़ाइन, 10 इंच का टचस्क्रीन, वेंटिलेटेड सीटें और ADAS है। इंजन विकल्पों में 1.0L और 1.5L TSI पेट्रोल, मैनुअल और ऑटोमैटिक ट्रांसमिशन शामिल हैं।