शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या मुहूर्तावर लॉन्च झाली आणखी एक ढासू SUV; किंमत फक्त एवढी, पण फीचर्स खूप सारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 17:08 IST

ग्लोबल एनसीएपीने हिला नुकतीच 5-स्टार सेफ्टी-रेटिंग दिली आहे...

स्कोडाने अपली मिडसाइज एसयूव्ही कुशाकचे (Skoda Kushaq) अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन लॉन्च केल्याचे वृत्त आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 15.59 लाख रुपये आहे. ही एसयूव्ही 4 व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. या एसयूव्हीचे प्रत्येक व्हेरिअंट, हिच्या रेग्युलर मॉडल प्रमाणे व्हेरिअंटच्या तुलनेत 30,000 रुपयांनी महाग आहे. टॉप-ऑफ-द-लाइन स्कोडा कुशाकच्या या एडिशनची किंमत 19.09 लाख रुपये एवढी आहे. अर्थात, हिच्या अ‍ॅनिव्हर्सरी एडिशनची किंमत 15.59 लाख रुपयांपासून सुरू होऊन 19.09 लाख रुपयांपर्यंत जाते.

स्कोडा कुशाक अ‍ॅनिव्हर्सरी एडिशनच्या सर्व व्हेरिअंट्सच्या किंमती --- Style 1.0 TSI MT- 15.59 लाख रुपये-- Style 1.0 TSI AT- 17.29 लाख रुपये-- Style 1.5 TSI MT- 17.49 लाख रुपये-- Style 1.5 TSI DCT- 19.09 लाख रुपये

कुशाक अ‍ॅनिव्हर्सरी एडिशनचे फीचर्स -कुशाक अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन स्टॅन्डर्ड मॉडेल प्रमाणेच बॉडी पेंट ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आली आहे. हिला सी-पिलर आणि स्टिअरिंग व्हीलवर स्पेशल 'अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन' बॅजिंग देण्यात आले आहे. यात नवे कँट्रास्ट स्टिचिंग, डोअर-एज प्रोटेक्टर आणि दरवाज्यांवर थोडा क्रोम एलिमेंट देण्यात आला आहे. फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास स्कोडा कुशाक अ‍ॅनिव्हर्सरी एडिशनमध्ये 10 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. हे अ‍ॅप्पल कारप्ले आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि रेन-सेंसरिंग वायपरही देण्यात आले आहे.

कुशाक अ‍ॅनिव्हर्सरी एडिशनचे सेफ्टी फीचर्स आणि इंजिन ऑप्शन्स -प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत या एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी) आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ग्लोबल एनसीएपीने हिला नुकतीच 5-स्टार सेफ्टी-रेटिंग दिली आहे. या कारमध्ये क्रूझ कंट्रोलही देण्यात आले आहे. ही कार दोन इंजिनच्या पर्यायांसह येते. हिला 1.0-लिटर, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर 4-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे.

टॅग्स :Skodaस्कोडाcarकारDiwaliदिवाळी 2022